राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) देशभरात ठिकठिकाणी संपूर्ण रमजान महिन्यात इफ्तार मेजवान्यांचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे. आरएसएसशी संलग्न संघटना मुस्लिम राष्ट्रीय मंच (MRM) या इफ्तार मेजवानीचे आयोजन करणार आहे. रमजानच्या पहिल्या 20 दिवसांत मंच पुष्कळ ठिकाणी रोजा इफ्तार मेजवानीचे आयोजन करेल. त्याचबरोबर उर्वरित 10 दिवस ईद मिलाप सोहळा सुरू राहणार आहे.For the first time, RSS is organizing Iftar banquets across the country during Ramadan
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) देशभरात ठिकठिकाणी संपूर्ण रमजान महिन्यात इफ्तार मेजवान्यांचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे. आरएसएसशी संलग्न संघटना मुस्लिम राष्ट्रीय मंच (MRM) या इफ्तार मेजवानीचे आयोजन करणार आहे. रमजानच्या पहिल्या 20 दिवसांत मंच पुष्कळ ठिकाणी रोजा इफ्तार मेजवानीचे आयोजन करेल. त्याचबरोबर उर्वरित 10 दिवस ईद मिलाप सोहळा सुरू राहणार आहे.
या शहरांवर विशेष लक्ष
आरएसएसचा हा उपक्रम मुस्लिम समाजापर्यंत पोहोचण्याचा मोठा प्रयत्न मानला जात आहे. या इफ्तार मेजवानीचे आयोजन राज्यभर केले जात असले तरी हैदराबाद आणि विजयवाडा या शहरांवर अधिक लक्ष दिले जाईल. एमआरएम म्हणजेच मुस्लिम राष्ट्रीय मंच अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित करत आहे. मात्र, याआधीही या मंचाने काही प्रसंगी इफ्तार आणि ईद मिलापचे आयोजन केले आहे.
मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संरक्षक डॉ. इंद्रेश कुमार यांनी आरएसएसच्या या उपक्रमाची माहिती दिली आहे. देशाच्या प्रगतीसाठी द्वेषाचे उच्चाटण आवश्यक असल्याचे ते म्हणाले. त्यामुळेच सर्वांना एकत्र आणण्यासाठी आम्ही हा ऐतिहासिक पुढाकार घेतला आहे.
त्यांनी माहिती दिली की, एमआरएमचा प्रत्येक कार्यकर्ता देशभरात रमजानच्या पवित्र महिन्यात किमान एक दिवस इफ्तार करेल. एमआरएमचे संस्थापक आणि मुख्य संरक्षक इंद्रेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संघटनेचे प्रवक्ते शाहिद सईद यांनी ही माहिती दिली. या वेळी रमजान 2 किंवा 3 एप्रिलपासून सुरू होत आहे. तथापि, त्याची निश्चित तारीख चंद्राच्या दर्शनाने ठरते.
मुस्लिम राष्ट्रीय मंच म्हणजे काय?
मुस्लिम राष्ट्रीय मंच ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संलग्न संघटना आहे. देशातील दोन धर्मांमधील द्वेष कमी करणे आणि मुस्लिमांना हिंदूंच्या जवळ आणण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर 2002 मध्ये या मंचाची स्थापना करण्यात आली होती.
For the first time, RSS is organizing Iftar banquets across the country during Ramadan
महत्त्वाच्या बातम्या
- महत्त्वाची बातमी : घटस्फोटित पतीला शिक्षक पत्नीने दरमहा द्यावी पोटगी, औरंगाबाद उच्च न्यायालयाचा आदेश
- पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती ! जिल्हाधिकारी यांचे आदेश; शासकीय कर्मचारी, शाळा, महाविद्यालयात हेल्मेट पुन्हा बंधनकारक
- शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शाळा मानक प्राधिकरण स्थापन
- 12 तासांच्या चौकशीनंतर नागपूरातील वादग्रस्त वकील सतीश उके यांना ईडीकडून अटक!!; ट्रान्झिट बेलवर नेणार मुंबईला!!