• Download App
    पहिल्यांदाच पाच ‘वंदे भारत ट्रेन’चे एकत्र उद्घाटन होणार ; जाणून घ्या, कोणत्या मार्गांवर धावणार! For the first time five Vande Bharat Trains will be inaugurated together

    पहिल्यांदाच पाच ‘वंदे भारत ट्रेन’चे एकत्र उद्घाटन होणार ; जाणून घ्या, कोणत्या मार्गांवर धावणार!

    देशभरात सध्या १८ वंदे भारत ट्रेन यशस्वीपणे धावत आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशात पहिल्यांदाच एकाच वेळी पाच वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या पाच वंदे भारत ट्रेनचे मार्ग निश्चित करण्यात आले असून, उद्घाटनाची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. For the first time five Vande Bharat Trains will be inaugurated together

    रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, २६ मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या पाच ‘वंदे भारत’ ट्रेनचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये एका ठिकाणी पंतप्रधान स्वत: उपस्थित राहणार आहेत तर इतर चार ठिकाणी ते व्हिडीओद्वारे झेंडा दाखवणार आहेत. या पाच वंदे भारत ट्रेन भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर, पाटणा-रांची, बंगळुरू-हुबळी आणि गोवा-मुंबई दरम्यान धावतील.

    सध्या देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १८ वंदे भारत ट्रेन यशस्वीपणे धावत आहेत. वंदे भारत ट्रेन कार्यरत नसलेल्या तीन राज्यांमध्ये गोवा, झारखंड आणि बिहार यांचा समावेश आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये, आसाम वगळता उर्वरित सर्व राज्यांमध्ये अद्याप ट्रॅकचे विद्युतीकरण झालेले नाही. आसाममध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झाली आहे.

    देशभरात सुरू झालेल्या १८ वंदे भारत ट्रेनचे मार्ग –

    देशातील पहिली वंदे भारत ट्रेन नवी दिल्ली ते वाराणसीपर्यंत धावली. ही ट्रेन फेब्रुवारी २०१९ मध्ये धावली होती. त्याच वेळी दुसरी ट्रेन देखील धार्मिक शहराशी जोडली गेली आणि ही ट्रेन नवी दिल्ली ते श्री वैष्णोदेवी कटरा दरम्यान धावली. तिसरी ट्रेन गुजरातमधील गांधीनगर ते मुंबई दरम्यान सुरू झाली, चौथा नवी दिल्ली ते अंब अंदौरा स्टेशन हिमाचल दरम्यान सुरू झाली. पाचवी वंदे भारत चेन्नई ते म्हैसूरपर्यंत आणि सहावी नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावली. त्याचप्रमाणे सातवी वंदे भारत ट्रेन हावडा ते न्यू जलपायगुडी, आठवी वंदे भारत ट्रेन सिकंदराबाद ते विशाखापट्टणम, नववी मुंबई ते सोलापूर, दहावी मुंबई ते शिर्डी,  अकरावी राणी कमलापती स्टेशन (भोपाळ) ते निजामुद्दीन, बारावी, तेरावी ट्रेन सिकंदराबाद ते तिरुपती आणि चेन्नई ते कोईम्बतूर, चौदवी ट्रेन दिल्ली ते अजमेर, पंधरावी तिरुअनंतपुरम ते कासारगोड,  सोळावी भुवनेश्वर ते हावडा,  सतरावी दिल्ली ते डेहराडून आणि अठरावी वंदे भारत ट्रेन न्यू जलपाईगुडी ते गुवाहाटी दरम्यान सुरू झाली आहे.

    For the first time five Vande Bharat Trains will be inaugurated together

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Toxic Cough Syrup : 2 राज्यांत कफ सिरपमुळे 23 मुलांचा मृत्यू; 5 राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरपवर बंदी, सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

    Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत टाइप-7 बंगला अलॉट; नवा पत्ता- 95 लोधी इस्टेट; खासदाराच्या घरी राहत होते

    Lawyer Rakesh Kishor Kumar : CJI वर बूट फेकणाऱ्या वकिलाने म्हटले- घडले त्याबद्दल पश्चात्ताप नाही; नशेत नव्हतो, सरन्यायाधीशांच्या देवाबद्दलच्या विधानाने वाईट वाटले