विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत साथ देणारे आणि ज्यांची मुलाखत राहुल गांधींनी घेतली असे रिझर्व बँकेचे माजी काँग्रेसनिष्ठ गव्हर्नर रघुराम राजन यांना पहिल्यांदाच भाजपमधून परखड उत्तर देण्यात आले आहे, ते देखील एका केंद्रीय मंत्र्याने दिले आहे. For the first time, BJP’s sharp reply to Congress loyal ex-governor Raghuram Rajan of RBI
केंद्रीय रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिक मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘रघुराम राजन हे असे राजकीय तज्ञ आहेत जे कोणाकडूनही पाठीवर वार करू शकतात’, असे वक्तव्य वैष्णव यांनी केले. वैष्णव यांनी हे विधान रघुराम राजन यांच्या कथित विधावार आले आहे, ज्यामध्ये त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना भारत प्रोडक्शन लिंक्ड इंसेन्टीव्ह योजनेअंतर्गत मोबाईल फोनची निर्मिती करत नसून केवळ त्यांची बांधणी करत असल्याचे म्हटले होते. त्यावर अश्विनी वैष्णव यांनी ‘जेव्हा चांगले अर्थतज्ज्ञ हे राजकीय तज्ज्ञ होतात तेव्हा त्यांचं आर्थिक ज्ञान कमी होते, असा टोला रघुराम राजन यांना हाणला.
पाठीमागून हल्ला करू नका
अश्विनी वैष्णव यांनी रघुराम राजन आता नेते झाले आहेत, अशी खोचक प्रतिक्रियाही नोंदवली. त्यांनी उघडपणे समोर आलं पाहिजे, निवडणूक लढली पाहिजे आणि राजकीय घडामोडींमध्ये भाग घेतला पाहिजे, असा सल्लाही अश्विवी वैष्णव यांनी दिला. पाठीमागून हल्ला करणं योग्य नाही. ते इतर कोणाच्या तरी बाजू घेत अशी विधान करत आहेत, असे अश्विनी वैष्णव म्हणाले.
इलेक्ट्रॉनिक निर्मितीत भारत पुढेच
पुढील 2 वर्षांमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीमध्ये 30 % अधिक वाढ करेल. जगभरामध्ये मोबाईल फोनसाठी आवश्यक असलेल्या सुट्या भागांची भारतातील 3 कंपन्या लवकरच निर्मिती करणार आहेत, असंही वैष्णव यांनी सांगितलं. ज्या ज्या देशांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्मिती सुरु केली आहे त्यांनी आधी पूर्णपणे नॉक्ड-डाऊन (सीकेडी) घटक, सेमी नॉक्ड-डाऊन (एसकेडी) उद्योगांना आर्षित करण्याबरोबरच उत्पादनांची बांधणी करण्याचा मार्गच निवडला, असं सांगत वैष्णव यांनी भारताची वाटचालही अशीच सुरु असल्याचं म्हटलं.
भारत 2 वर्षात कुठे असेल?
आज जागतिक स्तरावर पुरवठा साखळी एवढी गुंतागुंतीची आहे की कोणात्याही देशाला 40 % हून अधिक मूल्यवर्धित बाजारपेठेचा दावा करता येणार नाही. भारत येणाऱ्या 2 वर्षांमध्ये अधिक मूल्यवर्धनासंदर्भात 30 % पर्यंत पोहोचेल, असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला.
राजन यांची टीका योग्य नाही
ज्यापद्धतीने रघुराम राजन टीका करत आहेत, ती योग्य नाही. ते फारच उत्तम अर्थतज्ज्ञ आहेत. मी त्यांना अर्थतज्ज्ञ राहावे किंवा राजकीय तज्ज्ञ व्हावे असे सांगू इच्छितो, असा टोला अश्विनी वैष्णव यांनी लगावला.
काही महिन्यांपूर्वी राहुल गांधींनी काढलेल्या कन्याकुमारी ते काश्मीरदरम्यानच्या ‘भारत जोडो यात्रेत रघुराम राजनही सहभागी झाले होते. ही यात्रा राजस्थानमध्ये पोहोचली तेव्हा ते राहुल गांधींसोबत काही एका टप्प्यात एकत्र चालले होते. देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात राहुल गांधींनी त्यांची मुलाखतही घेतली होती.
For the first time, BJP’s sharp reply to Congress loyal ex-governor Raghuram Rajan of RBI
महत्वाच्या बातम्या
- लडाखमध्ये भीषण रस्ते अपघात, 9 सैनिक ठार; एक जखमी, कियारी शहराजवळ लष्कराचे वाहन खड्ड्यात पडले
- द फोकस एक्सप्लेनर : ई-रूपी म्हणजे काय? त्याचा वापर कसा करायचा? हे UPI पेक्षा किती वेगळे, वाचा सविस्तर
- द फोकस एक्सप्लेनर : भाजपच्या पसमांदाच्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसची रणनीती, काय आहे ‘जय जवाहर-जय भीम’ फॉर्म्युला?
- इम्रान खान यांना आणखी एक मोठा धक्का, सर्वात जवळचे नेते शाह मेहमूद कुरेशी यांनाही अटक!