• Download App
    ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांचे कॉरोनामुळे निधन|Flying Sikh Milkha Singh dies due to corona

    ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांचे कॉरोनामुळे निधन

    भारताचे माजी दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांचा कोरोनाशी सुरु असलेला लढा अखेर अपयशी ठरला आहे.कोरोना संक्रमणामुळे शुक्रवारी रात्री निधन झाले. मिल्खा सिंग यांच्या पत्नी आणि भारताच्या व्हॉलिबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौर यांनी कोरोना संक्रमणामुळे अखेरचा श्वास घेतला होता.Flying Sikh Milkha Singh dies due to corona


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :  भारताचे माजी दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांचा कोरोनाशी सुरु असलेला लढा अखेर अपयशी ठरला आहे.कोरोना संक्रमणामुळे शुक्रवारी रात्री निधन झाले.मिल्खा सिंग यांच्या पत्नी आणि भारताच्या व्हॉलिबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौर यांनी कोरोना संक्रमणामुळे अखेरचा श्वास घेतला होता.

    पद्मश्री मिल्खा सिंग यांनी वयाच्या ९१व्या वर्षी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्च्यात मुलगा आणि भारताचा स्टार गोल्फर जीव मिल्खा सिंग आणि तीन मुली असा परिवार आहे. शुक्रवारी रात्री ११.३०च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.’ शुक्रवारी संध्याकाळपासूनच मिल्खा सिंग यांची प्रकृती खालावली होती.



    त्यांच्या ऑक्सिजनची पातळीही खूप कमी झाली होती. गेल्याच महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मिल्खा सिंग यांची कोरोना चाचणी बुधवारी निगेटिव्ह आली होता.मिल्खा सिंग यांनी चार वेळा आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावले असून १९५८ सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही त्यांनी सुवर्ण कामगिरी केली होती.

    १९६० सालच्या रोम ऑलिम्पिकमध्ये काही शतांशच्या फरकाने त्यांचे कांस्य पदक हुकले होते. १९५९ साली मिल्खा सिंग यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मिल्खा सिंग यांच्या जीवनावर भाग मिल्खा भाग हा चित्रपटही आला होता.

    Flying Sikh Milkha Singh dies due to corona

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य