• Download App
    फ्लॉवर रिसायकलिंग! आलिया भटने Phool.co या पर्यावरण पूरक उत्पादन कंपनीत केली गुंतवणूक | Flower Recycling! Alia bhatt invests in eco friendly start up started by iit Kanpur alumni

    फ्लॉवर रिसायकलिंग! आलिया भटने Phool.co या पर्यावरण पूरक उत्पादन कंपनीत केली गुंतवणूक

    विशेष प्रतिनिधी

    कानपुर : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आता आयआयटी कानपूर पासआउट विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या कंपनी मध्ये गुंतवणूक करणार आहे. D2C वेलनेस कंपनी https://phool.co/ एक स्टार्टअप कंपनी आहे. 2017 मध्ये आय आय टी कानपुर मधून अभियांत्रिकी पदवी संपादन केलेल्या अंकित अग्रवालने ही कंपनी स्थापन केली आहे. टाकाऊ, सुकलेली फुले ही सर्क्युलॅर इकॉनॉमिक सिस्टिम चा भाग असू शकतात हा अनोखा विचार तिच्या डोक्यात आला नाही तिने ही कंपनी सुरू केली.

    Flower Recycling! Alia bhatt invests in eco friendly start up started by iit Kanpur alumni

    फुलांच्या कचऱ्यापासून चारकोल फ्री सुगंधीत उत्पादने तयार करणे. अश्या पर्यावरण पूरक, प्रदूषण विरहीत तंत्रज्ञानाचा उपयोग निरोगी उत्पादने निर्माण करण्यासाठी केला जातो. ह्या फ्लॉवर रिसायकलिंग तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन ‘फ्लेदर’ हे प्राण्यांच्या चामड्यासाठी हा एक पर्याय निर्माण केला गेला आहे. ज्याची नोंद PETA ने देखील घेतली होती तर सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते.


    NIRF Rankings 2021 : मिरांडा हाउस बेस्ट कॉलेज, इंजिनिअरिंगमध्ये IIT मद्रास टॉप, शिक्षण मंत्रालयने जारी केली NIRF रँकिंग


    ही कंपनी सुरू करण्यासाठी अंकिताने IAN फंड, सोशल अल्फा (FISE) आणि ड्रॅपर रिचर्ड्स कपलान फाउंडेशन (सॅन फ्रान्सिस्को) आणि IIT कानपूर यांच्याकडून $ 2 दशलक्ष इतका निधी उभा केला होता. ‘https://phool.co/ मध्ये आमचे ध्येय इनोव्हेशनद्वारे बदल घडवून आणणे, हेच आमचे ध्येय आहे.’ असे https://phool.co/ ची संस्थापक अंकित अग्रवाल म्हणते. “आलियाची गुंतवणूक ही आमच्या प्रयत्नांची पुष्टी आहे आणि आम्हाला जागतिक पातळीवर ह्या इनोव्हेशन द्वारे एक वेगळी यशोगाथा तयार करण्यास नक्कीच प्रोत्साहन मिळते आहे. असेही अंकिता म्हणाली.

    फुलांपासून धूप आणि बायो-लेदर बनवणे, ज्यामुळे नद्या स्वच्छ ठेवण्यास मदत होते आहे. लेदरला पर्याय निर्माण झाला आहे. भारताच्या मध्य प्रदेशातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यास ही कंपनी मोलाचं योगदान देत आहे. त्यामूळे ह्या कंपनी मध्ये गुंतवणूक करताना मला निश्चितच आनंद होत आहे असे आलिया भट यावेळी बोलताना म्हणाली होती.

    या वर्षाच्या सुरुवातीला, आलिया भट्टने Nykaa मध्ये गुंतवणूक केली होती.

    Flower Recycling! Alia bhatt invests in eco friendly start up started by iit Kanpur alumni

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य