• Download App
    दक्षिण कोरियातील पुरामुळे 35 जणांचा मृत्यू; 7,866 जणांना सुरक्षित स्थळी हलवले, लष्कराकडून मदतकार्य|Floods in South Korea kill 35; 7,866 evacuated to safer places, relief work by Army

    दक्षिण कोरियातील पुरामुळे 35 जणांचा मृत्यू; 7,866 जणांना सुरक्षित स्थळी हलवले, लष्कराकडून मदतकार्य

    वृत्तसंस्था

    सेऊल : दक्षिण कोरियात आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, भूस्खलन आणि पाणी साचल्यामुळे आतापर्यंत 35 लोकांचा मृत्यू झाला आहे. 7,866 लोकांना वाचवण्यात आले असून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी पंतप्रधानांनी लष्कराला मदत करण्यास सांगितले आहे.Floods in South Korea kill 35; 7,866 evacuated to safer places, relief work by Army

    त्याचवेळी चेओंगजू भागातील बोगद्यात पाणी भरल्याने रविवारी बससह 15 वाहने तेथे अडकली. बोगद्यातून आतापर्यंत 9 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हे लोक वेळेत बाहेर पडू शकले नाहीत, बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांचं मत आहे. 10 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे.



    25,470 लोकांच्या घरात वीज नाही

    दक्षिण कोरियामध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना उधाण आले आहे. अल जझिराच्या मते, उत्तर ग्योंगसांग प्रांतात सर्वाधिक 17 मृत्यू झाले आहेत. येथे पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे घरे वाहून गेली आहेत. उत्तर चुंगचेंगमध्ये गोसान धरण ओव्हरफ्लो झाले.

    त्यामुळे आजूबाजूच्या गावातून लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. दक्षिण कोरियाच्या गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार, 25,470 घरांमध्ये आठवडाभर वीज नाही. खराब हवामानामुळे 20 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच रुळांवर पाणी साचल्याने रेल्वेचा वेग कमी झाला आहे. 200 रस्तेही बंद करण्यात आले आहेत.

    सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याची सुमारे 59 प्रकरणे नोंदवली गेली, ज्यात रस्ते उद्ध्वस्त झाल्याच्या 18 घटनांचा समावेश आहे. दरम्यान, खासगी मालमत्तेचे नुकसान झाल्याची 80 प्रकरणे समोर आली आहेत.

    पंतप्रधान हान डक-सू यांनी आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व उपलब्ध संसाधने एकत्रित करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती युन सुक येओल युक्रेनच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी तेथूनच अधिकाऱ्यांना पुरात अडकलेल्या लोकांना मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत.

    Floods in South Korea kill 35; 7,866 evacuated to safer places, relief work by Army

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chabahar Port : परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण- चाबहार बंदराबाबत भारताला एप्रिलपर्यंत सवलत, अमेरिकेसोबतही चर्चा सुरू

    Rafale Jets : भारत 114 राफेल जेट्स खरेदी करणार; मेक इन इंडिया अंतर्गत तयार होतील; संरक्षण मंत्रालयाच्या समितीची मंजुरी

    Sajad Lone : जम्मू-काश्मीरला दोन स्वतंत्र राज्ये बनवण्याची मागणी; सज्जाद लोन म्हणाले- सलोख्याने वेगळे होण्यावर विचार करण्याची वेळ