वृत्तसंस्था
गुवाहाटी : आसाममध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना प्रचंड पूर आला असून त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसामच्या चिरांग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झाली आहे. त्या ठिकाणचे हजारो लोक बाधित झाले आहेत. अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. राज्यातील 28 जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. पुरामुळे तब्बल 19 लाख लोक बाधित झाले आहेत. या लोकांना होत असलेल्या अडचणींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त करून आसामला मदतीचे आश्वासन देखील दिले आहे.Floods disrupt life in Assam; 19 lakh people affected; Prime Minister’s assurance of help
पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता
आसाममध्ये अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी बोलून परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारकडून मदतीचे आश्वासनही दिले आहे.
54 लोकांचा मृत्यू
राज्यातील 35 जिल्ह्यातील 28 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. या 28 जिल्ह्यांतील 2 हजार 930 गावांतील 19 लाख लोक बाधित झाले आहेत. मुसळधार पावसानंतर दरड कोसळून दोन मुलांसह 9 जणांना जीव गमवावा लागला आहे. या पुरामुळे आत्तापर्यंत 54 लोकांचा मृत्यू झाला आहे. खेड्यापाड्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने, घरे पाण्याखाली जात आहेत.
Floods disrupt life in Assam; 19 lakh people affected; Prime Minister’s assurance of help
महत्वाच्या बातम्या
- Religiophobia : धार्मिक भयाचा प्रपोगंडा “निवडक” आणि दुटप्पी नको; भारताने अमेरिका, इस्लामी देशांना ठणकावले!!
- भाजप म्हणतोय गणिताचा आधार; आघाडीची फोडाफोडीवर मदार!!; फडणवीसांच्या डावाने होणार कोण गपगार??
- विधान परिषद निवडणूक : शिवसेनेचा आज वर्धापनदिन जल्लोषात नव्हे, दबावात; मैदानात नव्हे, हॉटेलात
- विधान परिषद : मतांच्या जुळवाजुळवी आधी कापाकापी!!; देशमुख, मालिकांची मते कापली; रवी राणांविरुद्ध अटक वॉरंट!!