• Download App
    बिहार, झारखंडमध्ये पुराचे थैमान; भागलपूरला सर्वाधिक मोठा फटका |Flood condition in Bihar and Zarkhand worsen

    बिहार, झारखंडमध्ये पुराचे थैमान; भागलपूरला सर्वाधिक मोठा फटका

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा – बिहार आणि झारखंडमध्ये पुराची स्थिती गंभीर होत आहे. गंगा नदीने रौद्र रूप धारण केल्याने भागलपूर येथे महापुराने थैमान घातले आहे. ५०० पेक्षा अधिक गावांना पाण्याचा वेढा पडला असून तीनशेहून अधिक शाळा पाण्याखाली गेल्या आहेत.Flood condition in Bihar and Zarkhand worsen

    राष्ट्रीय महामार्ग ३१ वर पुन्हा पाणी आले आणि काही ठिकाणी रस्त्याच्या खालचा भाग खचला. त्यामुळे वाहतूक थांबवण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग ३१ हा उत्तर, बिहार राज्यातून बंगालकडे जातो. हा मार्ग बंद केल्याने भागलपूरचा पूर्णिया, कटिहार आदी शहराशी असलेला थेट संपर्क तुटला आहे.



    पाटण्याहून भागलपूरमार्गे झारखंडच्या साहिबगंजकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग-८० वरील वाहतूक आठवड्याभरापासून बंदच आहे. सुलतानगंजपासून कहलगाव यादरम्यान एक डझनभर ठिकाणी एनएन-८० मार्गावर पाणी आले आहे. भागलपूरहून पूर्व आणि पश्चिामेकडे जाण्यासाठी आज सहाव्या दिवशीही रेल्वे वाहतूक बंद होती.

    भागलपूर येथे स्थिती चिंताजनक असून नऊ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातील शंभरपेक्षा अधिक राज्य महामार्गावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प पडली आहे.
    भागलपूरमध्ये शहराबरोबरच ग्रामीण भागात पाणीपातळी वाढू लागली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.

    Flood condition in Bihar and Zarkhand worsen

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार