• Download App
    खासगी रुग्णालयांतील लशींचे दर निश्चित; कोव्हिशिल्ड 780 तर कोव्हॅक्सिन 1410 रुपयांना|Fixed rates for vaccines in private hospitals; Covishield at Rs 780 and Covacin at Rs 1410

    खासगी रुग्णालयांतील लशींचे दर निश्चित; कोव्हिशिल्ड 780 तर कोव्हॅक्सिन 1410 रुपयांना

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने खासगी कंपन्यांना देण्यात येणाऱ्या लशींचे दर निश्चित केले आहेत. त्या अंतर्गत कोव्हिशिल्डसाठी 780 रुपये तर कोव्हॅक्सिन 1410 रुपये किंमत निश्चित केली आहे. स्पुटनिक व्ही या लसीसाठी 1145 रुपये किंमत ठरविली आहे.Fixed rates for vaccines in private hospitals; Covishield at Rs 780 and Covacin at Rs 1410

    कोव्हिशिल्ड लसीचा प्रति डोस 780 रुपयांना मिळणार आहे. यामध्ये 600 रुपये लसीची किंमत असून 30 रुपये जीएसटी आणि 150 रुपयांच्या सेवा शुल्काचा समावेश आहे.



    कोव्हॅक्सिन ही लस 1410 रुपयांना मिळणार आहे. यामध्ये 1200 रुपये लसीची किंमत असून 60 रुपये जीएसटी आणि 150 रुपयांचे सेवा शुल्क आहे. तर स्पुटनिक व्ही ही लस 1145 रुपये प्रति डोस दराने देण्यात येईल. यामध्ये 948 लसीची किंमत असून 47 रुपये जीएसटी आणि 150 रुपयांचे सेवा शुल्काचा समावेश आहे.

    लशींच्या दर ठरवण्यासोबतच दररोज देखरेखही ठेवली जाणार आहे. अधिक रक्कम घेतल्यास संबंधित कोरोना लसीकरण केंद्रावर कारवाई केली जाईल. रुग्णालयांना 150 रुपयांपेक्षा अधिक सेवा शुल्क आकारता येणार नाही, असे केंद्राने स्पष्ट केले. यावर राज्य सरकारांना देखील देखरेख ठेवावी लागेल.

    Fixed rates for vaccines in private hospitals; Covishield at Rs 780 and Covacin at Rs 1410

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य