• Download App
    रेल्वे स्टेशन की विमानतळ, गुजरातमधील गांधीनगर स्टेशनवर चक्क फाईव्ह स्टार हॉटेल|Five Star Hotel at Railway Station in Gandhinagar, Pm will inaugerate

    रेल्वे स्टेशन की विमानतळ, गुजरातमधील गांधीनगर स्टेशनवर चक्क फाईव्ह स्टार हॉटेल

    विशेष प्रतिनिधी

    गांधीनगर : गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगर येथील रेल्वे स्टेशनवर भारतीय रेल्वेच्या वतीने चक्क आंतरराष्ट्रीय सोई सुविधांसहित फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्यात आले आहे. या रेल्वे स्टेशनचे रुपडेच पालटून गेले असून विमानतळ असल्याचा भास होत आहे.Five Star Hotel at Railway Station in Gandhinagar, Pm will inaugerate

    त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. फाईव्ह स्टार हॉटेल असणारे गांधीनगर हे देशातील एकमेव रेल्वे स्टेशन असणार आहे.गांधीनगर स्टेशनचा समावेश भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे विभागांतर्गत होतो. या स्टेशनवर उभारण्यात आलेल्या पंचातारांकीत हॉटेलमध्ये ३१८ खोल्या असतील.



    एका खाजगी संस्थेतकडून हे संचालित केले जातील हे हॉटेल ७४०० चौरस मीटर परिसरात बांधण्यात आलंय. स्टेशनच्या आतूनच एक गेट बनवण्यात आले आहे. यातून े प्रवासी थेट स्टेशनवरून हॉटेलमध्ये प्रवेश करू शकतील. हॉटेलमध्ये लिफ्ट आणि एस्कलेटरच्या सुविधाही उपलब्ध आहेत. या प्रकल्पासाठी यासाठी जवळपास ७९० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. राष्ट्रीय तसेचआंतरराष्ट्रीय पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी हे हॉटेल आता सज्ज झाले आहे.

    ‘भारतीय रेल्वे’कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, येत्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुनर्विकसित गांधीनगर रेल्वे स्टेशनवर उभारण्यात आलेल्या पंचतारांकीत हॉटेल आणि इतर अनेक योजनांचे उद्घाटन करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांसहीत अनेक अधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत .गांधीनगर राजधानी स्टेशनवर प्रवाशांना शानदार अनुभव देण्यासाठी विशेष लायटिंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

    व्हर्च्युअल पद्धतीनं पंतप्रधान गांधीनगर – वाराणसी साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन आणि गांधीनगर – वरेथा मेमू ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. गांधीनगर रेल्वे स्टेशनचा विकास आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्याची सुरूवात करण्यात आली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारी २०१७ मध्ये भूमिपूजन करण्यात आले होते. या स्टेशनमध्ये एकूण तीन इमारती असणार आहेत. त्यांचा आकार फुलांच्या पाकळ्यांसारखा असणार आहे. रेल्वे स्टेशनच्या खालून रेल्वे गाड्या जाणार आहेत.

    याशिवाय रेल्वे स्टेशनवर ट्रांजिट हॉल, कियोस्क, दुकाने, बुक स्टॉल, फूड स्टॉल्स, मॉड्यूलर क्लीन टॉयलेट्स असतील. स्टेशनवर प्रवाशांना बसण्यासाठी ६०० खुर्च्या असणार आहेत. गुजरात सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या भागिदारीत हे हॉटेल उभारण्यात येणार आहे. हॉटेल जमीनीपासून २२ मीटर उंच असणार आहेत.

    त्याचबरोबर रेल्वे स्टेशनमध्ये प्रार्थना स्थळ, आरोग्य केंद्र असणार आहे. मल्टिप्लेस आणि ब्रॅँडेड रिटेल दुकानेही उघडण्याची योजना आहे. त्यासाठी रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची पीव्हीआर सिनेमा, बिग बाझार आणि शॉपर्स स्टॉपशी चर्चा सुरू आहे. या हॉटेलची इमारत ६५ मीटर उंच असणार आहे. त्यामुळे ही इमारत गांधीनगरमधील सर्वात उंच असणार आहे. हॉटेलात स्विमींग पूलही असणार आहे.

    Five Star Hotel at Railway Station in Gandhinagar, Pm will inaugerate

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य