विशेष प्रतिनिधी
हैदराबाद – आंध्र प्रदेशातील न्यायाधीशांविरुद्धच्या सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी सीबीआयने पाच जणांना अटक केली.सीबीआयने अटक केलेल्यांपैकी तीन जणांना कालच ताब्यात घेण्यात आले होते, तर दोन जणांना आज अटक केली.five arrested for social media post
पट्टापू आदर्श आणि लवनुरू सांबा शिव रेड्डी अशी या दोघांची नावे आहेत. यापूर्वी धामी रेड्डी कोंडा रेड्डी, पामुला सुधीर आणि लिंगारेड्डी राजशेखर रेड्डी या तिघांवर कारवाई करण्यात आली होती,कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीश जेव्हा धमकी मिळत असल्याची तक्रार करतात तेव्हा सीबीआय आणि आयबी कारवाई करत नाहीत.
त्यांच्या तक्रारीकडे लक्षही देत नाहीत, अशी टिपणी सरन्यायाधीश ए. व्ही. रमण यांनी केली होती. त्यानंतरच सीबीआयने ही कारवाई केली आहे.न्यायाधीशांच्या सुरक्षिततेसंबंधीची एक याचिकाही प्रलंबित आहे. त्याबाबतही एका आठवड्यात उत्तर देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला सांगितले आहे.
five arrested for social media post
महत्तवाच्या बातम्या
- ममतांना काँग्रेसने दिल्लीत दिली ओसरी; ममता पूर्वेकडे राजकीय हात पाय पसरी…!!
- कोरोनाचे लसीकरण प्रमाणपत्र सेकंदात उपलब्ध, व्हॉट्सअॅपवर मिळेल ; फक्त मोबाईलवरुन पाठवावा लागेल संदेश
- इंडो तिबेट बॉर्डर पोलीसच्या जवानांची दिलेरी, युध्दग्रस्त अफगणिस्थानात पुन्हा नियुक्तीच्या मागणीसाठी याचिका, न्यायालयालाही आश्चर्य, मात्र याचिका फेटाळली
- धक्कादायक, एकट्या महिलेला पोलंडला कसे पाठवायचे म्हणून कर्णबधिर धावपटूची उत्तुंग कामगिरी असूनही स्पर्धेसाठी पाठविले नाही, सोबत कोणाला पाठविण्यासाठी निधी नसल्याचे कारण