• Download App
    New York City ऐतिहासिक निर्णय; न्यूयॉर्कमध्ये सर्व शाळांना

    New York City : ऐतिहासिक निर्णय; न्यूयॉर्कमध्ये सर्व शाळांना 1 नोव्हेंबरला दिवाळीची सार्वजनिक सुट्टी!!

    New York City

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : New York City  अमेरिकेत भारतीयांचा प्रभाव वाटत असल्याचे बरेच निदर्शक समोर दिसतात. त्यापैकी अमेरिकेचे अध्यक्ष दरवर्षी वाईट हाऊस मध्ये भारतीय समुदायाला निमंत्रित करून दिवाळी साजरी करतात. पण त्यापलीकडे जाऊन संपूर्ण अमेरिकन समाजच दिवाळी सेलिब्रेशन मध्ये सहभागी होतो.New York City

    आता अमेरिकेतील सगळ्यात मोठे शहर न्यूयॉर्कमध्ये 1 नोव्हेंबरला दिवाळीचे सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्या दिवशी न्यूयॉर्क मधल्या सर्व शाळा दिवाळीनिमित्त बंद राहतील. न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स यांनी हा निर्णय जाहीर केला.



    न्यूयॉर्क मधल्या सर्व शाळांमध्ये तब्बल 1.1 मिलियन मुले शिकतात. त्यामुळे एकदम निर्णय घेऊन सगळ्या शाळा बंद करणे शक्य नसते. परंतु प्रशासनाने आधी नियोजन करून आता 1 नोव्हेंबर दिवाळीचा पाडवा या दिवशी दिवाळीची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे, असे न्यूयॉर्कच्या महापौर कार्यालयातील डेप्युटी कमिशनर दिलीप चौहान यांनी स्पष्ट केले.

    अमेरिकेत भारत यांचा प्रभाव वाढल्याचे हे निदर्शक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ज्यावेळी अमेरिकेत दौरा होतो. त्यावेळी मोठमोठ्या शहरांमध्ये भारतीय समुदाय जमीन त्यांचे स्वागत करतो. ती संख्या काही हजारांमध्ये असते. त्याचबरोबर न्यूयॉर्क सारख्या शहरांमध्ये तर लाखो भारतीय उद्योगधंदे व्यवसाय आणि नोकऱ्यांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. त्याचा परिणाम अमेरिकन प्रशासनाच्या धोरणावर ठळकपणे दिसून भारतीय सणवारांना तिथे सार्वजनिक महत्त्व आले आहे.

    “First time in history of New York City, schools will be closed on Diwali”; says US official

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार