प्रतिनिधी
बेंगलोर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रचाराने आता असभ्यतेचा तळ गाठला आहे. आधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ घसरली आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना “विषारी साप” म्हणाले त्यानंतर त्यांना आपल्याला “तसे” म्हणायचे नव्हते, अशी मखलाशी करून माफी मागावी लागली. पण तरी देखील काँग्रेसची घसरगुंडी थांबलेली नाही. त्यापलीकडे जाऊन आता मल्लिकार्जुन खरेदी यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांची जीभ घसरली आहे आणि त्यांनी मोदींचा उल्लेख “नालायक पुत्र” असा केला आहे.First the tongue of Mallikarjuna Kharge, now the son of Kharge slipped; After the “poisonous snake” remark, Modi was called a “worthless son”.
कलबुर्गी येथे काँग्रेसच्या प्रचारासाठी घेतलेल्या बंजारा समाजाच्या मेळाव्यात प्रियांक खर्गे यांची जीभ घसरली. प्रियांक खर्गे म्हणाले, की पंतप्रधान मोदी बंजारा समाजाच्या मेळाव्यात येऊन म्हणाले होते, की बंजारा समाजाने काही काळजी करू नये. त्यांच्यासाठी आरक्षण लागू करू. बनारसचा पुत्र इथे आला आहे. पण हा पुत्र जर नालायक निघाला तर बंजारा समाजाने काय करायचे?, असा सवाल प्रियांक खर्गे यांनी करून आपल्या प्रचाराची पातळी किती घसरली आहे हेच दाखवून दिले!!
त्यांचे वडील मल्लिकार्जुन खर्गे पंतप्रधान मोदींना “विषारी साप” म्हणाले होते. पण त्यानंतर त्यांना आपल्याला “तसे” म्हणायचे नव्हते, असे सांगून माफी मागावी लागली होती. त्यानंतर तरी काँग्रेसचे नेते प्रचाराच्या भाषेचा दर्जा टिकवून ठेवतील, असे वाटत होते. पण प्रत्यक्षात तसे न घडता प्रचाराची पातळी आणखीनच घसरली आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचेच पुत्र प्रियांक खर्गे यांनी मोदींचा उल्लेख “नालायक पुत्र” असा करून भाजपच्या हातात आयते राजकीय कोलीत दिले आहे. प्रदेश भाजपने प्रियांक खरेदी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
First the tongue of Mallikarjuna Kharge, now the son of Kharge slipped; After the “poisonous snake” remark, Modi was called a “worthless son”.
महत्वाच्या बातम्या
- ” उबाठाचा प्रवास ‘ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिस्टांकडे’ असल्याने भविष्यात…” आशिष शेलारांनी लगावला टोला!
- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत 317 तालुक्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रमाचा प्रारंभ
- LPG सिलिंडर आज 171.50 रुपयांनी झाला स्वस्त, जाणून घ्या दिल्ली ते चेन्नईचे नवे दर
- ऑनलाईन प्रेम प्रकरणाचा भयानक शेवट; ‘ISI’च्या षडयंत्रात अडकलेल्या विद्यार्थ्याला हेरगिरीच्या आरोपात जावे लागले तुरुंगात!