• Download App
    हिमाचल काँग्रेस : आधी धाकधूक, नंतर फुटाफुटीची शंका आणि आता मुख्यमंत्री पदाची स्पर्धा First the intimidation, then the suspicion of disunity and now the contest for the post of chief minister

    हिमाचल काँग्रेस : आधी धाकधूक, नंतर फुटाफुटीची शंका आणि आता मुख्यमंत्री पदाची स्पर्धा

    विशेष प्रतिनिधी

    शिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताना आधी धाकधूक, नंतर आमदारांच्या फाटाफुटीची शंका आणि आता मुख्यमंत्री पदाची स्पर्धा अशी अवस्था काँग्रेसची झाली आहे. First the intimidation, then the suspicion of disunity and now the contest for the post of chief minister

    निवडणूक निकालाच्या दिवशी म्हणजे काल 8 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळपर्यंत हिमाचल प्रदेशात बहुमत कोणाला मिळणार??, भाजपशी काँग्रेसची टक्कर यशस्वी होणार का??, याची काँग्रेस मध्ये धाकधूक होती. पण काँग्रेस आणि भाजप यांच्यातल्या आमदारांच्या संख्येत मोठ्या अंतर पडत गेले आणि काँग्रेसला 40 जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळाले तेव्हा मात्र काँग्रेसच्या गोटात आनंद पसरण्याऐवजी काँग्रेस मधून आमदार फुटण्याची धास्ती वाटायला लागली. या धास्तीतूनच नेहमीप्रमाणे “अटॅक इज द बेस्ट डिफेन्स” या उक्तीनुसार छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांनी भाजपवर फोडाफोडीच्या शंका घेऊन आरोप करायला सुरुवात केली. ते आरोप करून झाल्यानंतर मात्र जेव्हा काँग्रेसचे स्पष्ट बहुमत ठळक झाले, त्यावेळी मात्र काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा सुरू झाली आणि गटबाजी उफाळली.

    कै. वीरभद्र सिंग यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला. त्यांचे चिरंजीव विक्रमादित्य सिंह यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आले. पण त्यांना आपल्या आईला मुख्यमंत्री बनलेले पाहायचे आहे, तर दुसरीकडे वीरभद्र सिंह यांचे राजकीय स्पर्धक सुक्कू यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आले. हिमाचल प्रदेशात 5 नेते अचानक मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत दिसायला लागले. या सर्वांनी हिमाचल प्रदेश मधला विजय प्रियांका गांधी यांना समर्पित केला आहे.

    पण त्याचवेळी वीरभद्र सिंह यांची विरासत लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यांच्या नावावरच काँग्रेसने निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी निवडून आलेले आमदार नेता निवडतील तो हायकमांडने कबूल करावा, अशी मागणी प्रतिभा सिंह यांनी करत आपण “जगन मोहन रेड्डी इन मेकिंग” आहोत हे सिद्ध केले.

    एकूण हिमाचल प्रदेशात काँग्रेसचा विजय झाला असला तरी तो पचायला जड जात आहे. कारण काँग्रेस पक्षात वारसा हक्काने आलेली घराणेशाहीची गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे.

    First the intimidation, then the suspicion of disunity and now the contest for the post of chief minister

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!

    Masood Azhar : मसूद अझहर पाकच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला दहशतवादी केंद्र उघडणार; 15 दिवसांचा दहशतवाद अभ्यासक्रम