विशेष प्रतिनिधी
चेन्नई : ‘मागीझिनी : इट्स नॉट माय फॉल्ट’ हे तमिळ एलजीबीटी सॉंग नुकताच प्रदर्शित झाले आहे. आणि मुख्य म्हणजे ह्या गाण्याच्या रिलीजनंतर हे तुफान व्हायरल होत आहे. हे पहिलेच तामिळ एलजीबीटीक्यू गाणे आहे. गौरी किशन आणि अनघा या दोघीही यामध्ये अॅक्टिंग करताना दिसून येत आहेत. या दोघींनीही भरतनाट्यम डान्सरची भूमिका साकारली आहे.
First Tamil LGBTQ song ‘Magizini: It’s Not My Fault’ Goes Viral
या गाण्याचे संगीत गोविंद वसंता यांनी दिले आहे. तर डिरेक्शन वी जी बालसुब्रमण्यम यांनी केले आहे. सारेगामा ओरिजनल्स द्वारे निर्मिती केलेले हे सॉंग गायले आहे कीर्तना वैद्यनाथन यांनी.
या व्हिडिओची सुरूवात होते, जेव्हा गौरी अनघाला समजावत असते आणि शेवट होतो त्या दोघी भरतनाट्यम डान्स करत असतात तेव्हा. या दोघींच्या प्रेमकहाणीची सुरवात भरतनाट्यमच्या क्लासपासून सुरु होते. अनघाची चेन्नईमध्ये शिकण्यासाठी आलेली असते. तर गौरींच्या पॅरेंट्स नुकताच कळाले असते की त्यांची मुलगी लेस्बियन आहे. एक दिवशी या दोघी अनघाच्या घरी रात्रभर थांबतात. जेव्हा गौरीच्या वडिलांना ही गोष्ट कळते, तेव्हा ते गौरीला घरातून हाकलून देतात. आणि येथून सुरू होतो त्यांच्या प्रेमकहानीचा स्ट्रगल. अशी कहाणी सांगणारा हा म्युझिकल व्हिडिओ नुकताच प्रदर्शित झाला आहे.
‘ LGBTQ समुदाय भीतीने लपला ‘, अफगाण समलिंगी कार्यकर्त्याने तालिबानी राजवटीबद्दल व्यक्त केली चिंता
आपण कोणावर प्रेम करावे, हे आपण ठरवत नाही. आणि आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो त्यामुळे आपल्या दोषी ठरवणे हे देखील चुकीचे आहे. प्रेम ही अतिशय नैसर्गिक भावना आहे. जी बऱ्याच वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि या पुढे देखील अस्तित्वात राहणार आहे. प्रेम आहे म्हणूनच या जगाची निर्मिती झालेली आहे. असा संदेश, ही सत्यता या गाण्यांमधून दिग्दर्शकांना सांगायची आहे.
हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागे डाबर ब्रँडच्या जाहिरातीमध्ये लेस्बियन जोडपे दाखवल्या नंतर नेटकाऱ्यांनी त्या जाहिरातीला बरंच ट्रोल केलं होतं. शेवटी डाबर कंपनीने ती जाहिरात चालवणे बंद केले होते. या पाश्र्वभूमीवर या गाण्याचे मात्र सर्व स्तरातून स्वागत झाले आहे.
First Tamil LGBTQ song ‘Magizini: It’s Not My Fault’ Goes Viral
महत्त्वाच्या बातम्या
- कॉँग्रेसचा बंगळुरूमधील भंगारवाला देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार, १७०० कोटींहून अधिक संपत्ती, शिक्षण केवळ पाचवी
- मतांनी नव्हे तर लष्कराच्या पाठिंब्याने इम्रान खान सत्तेवर, नवाझ शरीफ यांना भ्रष्टाराचाच्या जाळ्यात अडकविण्याचाही कट
- WATCH : वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हिंगोलीत साकारतेय घनदाट जंगल
- सुप्रिम कोर्ट आदेश पाळत परमबीर सिंहांचे चौकशीत सहकार्य; साडेसहा तास चौकशीत सर्व आरोप फेटाळले!