• Download App
    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाचे देशभर काँग्रेसकडून वेगळे आयोजन; केंद्र सरकारच्या कार्यक्रमांना “राजकीय काटशह” first meeting of the Congress committee set up to plan and coordinate the year-long celebration of the 75th year of independence being held at the residence of former PM Dr. Manmohan Singh

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाचे देशभर काँग्रेसकडून वेगळे आयोजन; केंद्र सरकारच्या कार्यक्रमांना “राजकीय काटशह”

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे काँग्रेस पक्षाकडून स्वतंत्रपणे आयोजन करण्यात येणार आहे. या आयोजनासाठी आज माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या समितीची पहिली बैठक झाली. first meeting of the Congress committee set up to plan and coordinate the year-long celebration of the 75th year of independence being held at the residence of former PM Dr. Manmohan Singh

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर जे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, त्याचे स्वरूप आणि नियोजन ठरविण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. केंद्र सरकारच्या पातळीवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाचे विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत. ९ राज्यांमध्ये आदिवासींच्या स्वातंत्र्ययुध्दाची स्मारके उभारण्यात येत आहेत. त्याची उद्घाटने येत्या वर्षभरात वेगवेगळ्या दिवसांमध्ये करण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे.

    या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचे सर्वोच्च योगदान होते. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने स्वातंत्र्याचे आंदोलन चालविले. यात काँग्रेसची अहिंसक आंदोलने, महात्मा गांधींची दांडी यात्रा, सत्याग्रह, १९४२ ची चलेजाव चळवळ आदी कार्यक्रमांच्या स्मरणांवर भर देण्यात येणार आहे.

    महात्मा गांधींना सशस्त्र क्रांतिकारकांचा मार्ग पसंत नव्हता. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये १८५७ च्या स्वातंत्र्य समरातले क्रांतिकारक, सावरकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद फौज यांच्या सारख्या क्रांतिकारकांच्या स्मरणाला फारसे स्थान असणार नाही. असलेच तर ते महात्मा गांधी यांच्या अहिंसक चळवळीच्या तुलनेत दुय्यम असेल, हे उघड आहे.

    केंद्र सरकारने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये शसस्त्र क्रांतिकारकांच्या स्मरणाच्या कार्यक्रमांना विशेष स्थान देण्यात आले आहे. त्यालाच राजकीय काटशह देण्यासाठी काँग्रेसने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे वेगळे कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी आज काँग्रेसच्या समितीची बैठक घेण्यात आली.

    या बैठकीला डॉ. मनमोहन सिंग, ए. के. अँटनी, गुलामनबी आझाद, अंबिका सोनी, मीरा कुमार, प्रमोद तिवारी, मुकूल वासनिक आदी नेते उपस्थित होते.

    first meeting of the Congress committee set up to plan and coordinate the year-long celebration of the 75th year of independence being held at the residence of former PM Dr. Manmohan Singh

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य