- देशातील पहिली हायड्रोजन कार रस्त्यावर उतरली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ही कार लाँच करण्यात आली.
- या कारची टाकी एकदा फुल केली की ती 650 किमी अंतर कापणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील पहिली हायड्रोजन कार रस्त्यावर उतरली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ही कार लाँच करण्यात आली.टोयोटाने हायड्रोजनवर चालणारी कार फ्यूअल सेल इलेक्ट्रिक व्हीकल्स (FCEV) नुसार ही कार पायलट प्रोजेक्ट म्हणून आणली आहे. ही कार लक्झरी वाहनांमध्ये असणार आहे. या कारची टाकी एकदा फुल केली की ती 650 किमी अंतर कापणार आहे.या कारचे नावं मिराई असे ठेवण्यात आले आहे .याचा अर्थ जापनीज मध्ये भविष्य असा होतो. FIRST HYDROGEN CAR: Toyota Mirai! Mirai is the future … the first hydrogen car in the country! 1 rupee cost for 2 km; Nitin Gadkari’s dream project ….
नितिन गडकरी यांच्यासोबत केन्द्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, महेन्द्रनाथ पांडेय,आरके सिंह उपस्थित होते. गडकरी म्हणाले, ही कार कमी खर्चात चालविता येणार आहे. भविष्यात जेव्हा आपल्या देशात हायड्रोजन स्टेशन उभे राहतील तेव्हा दोन किमीसाठी एक रुपयाचा खर्च येणार आहे.
गडकरी वापरणार
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मिराई हायड्रोजनवर आधारित प्रगत इंधन सेल इलेक्ट्रिक वाहनासाठी पायलट प्रकल्प सुरू केला आहे. गडकरींनी देखील अलीकडेच सांगितले होते की ते स्वतः टोयोटा मिराई वापरण्यास सुरुवात करतील, तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) वाहनासाठी हायड्रोजनचा पुरवठा करेल.
एक किलो हायड्रोजनची किंमत एक डॉलर म्हणजेच ७० रुपये आहे. या ७० रुपयात १२० किमीचे अंतर ही कार कापणार आहे. पायलट प्रोजेक्टनंतर या दिशेने वेगाने काम होईल. या कारची टाकी ६.२ किलो क्षमतेची आहे. यामुळे ही कार एकदा टाकी फुल केली की ६५० किमी धावेल.
Toyota Kirloskar Motor ने इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) च्या सहकार्याने जगातील सर्वात प्रगत FCEV Toyota Mirai चा अभ्यास आणि मूल्यांकन करण्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आहे, जो भारतीय रस्ते आणि हवामानात हायड्रोजनवर चालेल. टोयोटा मिराई असे त्याचे नाव आहे.
FIRST HYDROGEN CAR : Toyota Mirai! Mirai is the future … the first hydrogen car in the country! 1 rupee cost for 2 km; Nitin Gadkari’s dream project ….
महत्त्वाच्या बातम्या
- ‘द काश्मीर फाइल्स” लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये
- जगातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भारतातही चिंता
- रशिया- युक्रेन युध्दाचा भारतीय तेल कंपन्यांना फायदा, रशियाकडून सवलतीत ३० लाख बॅरल तेल
- हरभजन सिंग बनणार आपचा खासदार, राज्यसभेवर पाठविण्याची तयारी
- योगी आदित्यनाथ यांची गरीबांना भेट, गरीब कल्याण अन्न योजना मार्च २०२२ पर्यंत वाढविणार