• Download App
    ‘डेल्टा प्लस’मुळे मध्य प्रदेशात पहिल्या मृत्यूची नोंद! , देशात तिसऱ्या लाटेची धास्ती; ४० जणांना बाधा First death recorded in Madhya Pradesh due to 'Delta Plus'! , The threat of a third wave in the country; 40 peoples are Affected

    ‘डेल्टा प्लस’मुळे मध्य प्रदेशात पहिल्या मृत्यूची नोंद! , देशात तिसऱ्या लाटेची धास्ती; ४० जणांना बाधा

    वृत्तसंस्था

    भोपाळ : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना ‘डेल्टा प्लस’ या नवीन प्रकारामुळे चिंतेचे वातावरण आहे. असे असताना ‘डेल्टा प्लस’ मुळे मध्यप्रदेशात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. First death recorded in Madhya Pradesh due to ‘Delta Plus’! , The threat of a third wave in the country; 40 peoples are Affected

    उज्जैन येथील महिलेच्या कोरोनामुळे मृत्यूनंतर त्यांचे नमुने घेतले होते. नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी दिल्लीला पाठविले होते. दरम्यान त्यांच्या रिपोर्टमध्ये डेल्टा प्लस हा नवीन प्रकार आढळला आहे. मध्य प्रदेशात आतापर्यंत डेल्टा प्लसची दोन प्रकरणे नोंदली गेली आहेत. यातील तीन प्रकर भोपाळची असून दोन प्रकरणे उज्जैनमधील आहेत. यातील चौघे बरे झाले आहेत, पण एकाचा मृत्यू झाला आहे.

    उज्जैनचे नोडल अधिकारी डॉ. रौनक यांनी इंडिया टूडेला याबाबत माहिती दिली, ते म्हणाले, “डेल्टा प्लसची बाधा झाल्याने २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तिच्या पतीलाही कोरोना झाला होता. पतीने लसीचे दोन्ही डोस घेतले होते. बरा झाला. मात्र, महिलेने एकही डोस घेतला नव्हता.”

    डेल्टा प्लसमुळे कोरोनाची तिसरी लाट ?

    देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याने चिंता व्यक्त होत असताना डेल्टा प्लसच्या विषाणूंनी यामध्ये भर टाकली आहे. दरम्यान काही तज्ज्ञ डॉक्टर तसेच जनुकीय क्रमनिर्धारकांनी (जिनोम सीक्वेन्सर) हे नवे विषाणू या संक्रमण वाढीस कारणीभूत ठरत नसल्याचं म्हटलं आहे. इन्सिट्यूट ऑफ जिनोमिक्स अॅण्ड इंटरग्रेटिव्ह बायालॉजीचे सं चालक डॉक्टर अनुराग अग्रवाल यांनी दुसऱ्या लाटेत सुरक्षेचे नियम कमी केले जाऊ नयेत,अशी सूचना केली आहे. दरम्यान. देशात ‘डेल्टा प्लस’चे देशात ४० रुग्ण आढळले आहेत.

    First death recorded in Madhya Pradesh due to ‘Delta Plus’! , The threat of a third wave in the country; 40 peoples are Affected

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार