वृत्तसंस्था
भटिंडा : पंजाबमधील लष्करी ठाण्यावर बुधवारी गोळीबार झाला होता. भटिंडा येथे झालेल्या या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झाल्याचे लष्कराने सांगितले. ठार झालेले सैनिक आहेत की नागरिक हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.Firing at army base in Punjab’s Bhatinda, 4 killed, area sealed, Quick Response Team operation underway
लष्कराने सांगितले की, सकाळी 4:35 वाजता ऑफिसर्स मेसमध्ये गोळीबार झाला. लष्करी ठाण्यामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. लष्कराने अद्याप याला दहशतवादी हल्ला म्हटलेले नाही. तथापि, ही शंका नाकारलेलीही नाही. मात्र, भटिंडाचे एसएसपी म्हणाले की, हा दहशतवादी हल्ला नाही. पोलिसांना कॅन्टमध्ये प्रवेश दिला जात नाही.
कॅन्टोन्मेंटमधून प्रवेश आणि बाहेर जाण्यावर निर्बंध
कॅन्टोन्मेंटमध्ये लोकांना प्रवेश आणि बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय यंत्रणांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पंजाब पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही कॅन्टमध्ये पोहोचले आहेत. भटिंडा छावणी ही आशिया खंडातील सर्वात मोठी लष्करी छावणी आहे.
भटिंडाच्या एसएसपींनी कोणत्याही दहशतवादी हल्ल्याचा इन्कार केला आहे. पोलीस याला परस्पर संघर्षाची घटना म्हणत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पोलिसांना लष्करी ठाण्याच्या आत प्रवेश दिला जात नाही. पोलिस आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
नवीन माहितीनुसार ही घटना अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये घडली आहे. घटना घडली तेव्हा पहाटेचे 4.35 वाजले होते. त्यामुळे लष्करी अधिकाऱ्यांमधील हा प्रकार असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. आता गोळीबार थांबलेला आहे. आधी गोळीबार सुरू असल्याची बातमी आली होती.
पूर्वी शहराबाहेर होते मिलिटरी स्टेशन
भटिंडा मिलिटरी स्टेशन शहराला लागून आहे. हे एक जुने आणि खूप मोठे मिलिटरी स्टेशन आहे. पूर्वी ते शहरापासून थोडे लांब होते, परंतु शहराच्या विस्तारामुळे आता मिलिटरी स्टेशन रहिवासी भागाच्या जवळ आले आहे. या मिलिटरी स्टेशनच्या बाहेर कोणत्याही सामान्य वाहनाने जाता येते. या स्थानकाबाहेर सहसा जबरदस्त सुरक्षा व्यवस्था असते.
Firing at army base in Punjab’s Bhatinda, 4 killed, area sealed, Quick Response Team operation underway
महत्वाच्या बातम्या
- अभिमानास्पद : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
- पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पसरले हास्य; आतापर्यंत १.३ लाख कोटी रुपयांचे अदा करण्यात आले दावे
- ठाकरे – पवार सिल्वर ओकवर भेट; महाविकास आघाडीतील मतभेदांवर चर्चा की काही पॉलिटिकल सरप्राईज एलिमेंट??
- Karnataka election : भाजपाने १८९ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत ५२ नवीन नावं