प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा होण्यापूर्वीच सिद्धरामय्या समर्थकांनी बंगलोर मध्ये जोरदार जल्लोष केला फटाके फोडून आतषबाजी केली. त्यांच्या फोटोला पेढे भरवले. पण एवढे सगळे होऊनही कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम राहिला आहे. कारण काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अद्याप त्यांच्या नावाची घोषणाच केलेली नाही.Firecrackers and jubilation even before Siddaramaiah’s name was announced; But Karnataka’s Chief Minister’s position remains
काँग्रेसमध्ये लोकशाहीला खूप महत्व असून सर्वांचे मत लक्षात घेतल्यानंतरच मुख्यमंत्री ठरविण्यात येणार असल्याचे स्पष्ट मत कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केले. काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचे नाव काँग्रेसने जाहीर केले नाही. तसेच अफवावर विश्वास ठेवू नका येत्या एक दोन दिवसात आम्ही स्वतः मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करू असेही सुरजेवाला यांनी जाहीर केले.
काँग्रेस हायकमांडने सिद्धरामय्या यांना कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र डीके शिवकुमार यांना हा निर्णय मान्य नाही. सोनिया आणि राहुल गांधी यांच्याशी तासभर चर्चा करूनही सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री बनवण्यास ते राजी झाले नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना स्वतः उपमुख्यमंत्री व्हायचे नाही. मात्र कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना मुख्यमंत्री बनवल्यास त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार असल्याचे त्यांचे डी. के. शिवकुमार यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया सुरू असल्याचे कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. निर्णय होताच आम्ही जाहीर करू. दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळ स्थापन होईल. पण शपथविधीची तयारी बंगळुरूच्या कांतीरवा स्टेडियममध्ये सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री पदाबाबत गेल्या चार दिवसांपासून बंगळुरू ते दिल्लीपर्यंत अनेक बैठका झाल्या. या शर्यतीत सिद्धरामय्या आघाडीवर होते. तत्पूर्वी, रविवारी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सर्व आमदारांनी खर्गे यांना नेता निवडीचे अधिकार दिले होते. यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी निरीक्षकांना सर्व आमदारांशी वन टू वन चर्चा करण्यास सांगितले होते. त्यापैकी ८० हून अधिक आमदारांनी सिद्धरामय्या यांच्या बाजूने मतदान केल्याच्या बातम्या आहेत. पण काँग्रेसच्या अधिकृत सूत्रांनी त्याला दुजोरा दिलेला नाही.
Firecrackers and jubilation even before Siddaramaiah’s name was announced; But Karnataka’s Chief Minister’s position remains
महत्वाच्या बातम्या
- West Bengal : पूर्व मिदनापूरच्या इगरामध्ये बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट सहा जणांचा मृत्यू
- सिद्धरामय्या की शिवकुमार??; गांधी परिवारात आई विरुद्ध मुलगा; मल्लिकार्जुन खर्गे पेचात!!
- अमेरिकन शिष्टमंडळाने राजदूत एरिक गारसेट्टींच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट
- आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता 25000 रुपये; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय