COVID protocols : येथील मुस्लिम समाजाचे धार्मिक नेते काझी शेख अब्दुल हमीद मुहम्मद सालिमुल काद्री बदायूंनी यांचे रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला चाहत्यांची अलोट गर्दी उसळली. यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. या अंत्ययात्रेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. FIR registered against unidentified people for violating COVID protocols in Budaun in UP
वृत्तसंस्था
बदायूं (उत्तर प्रदेश) : येथील मुस्लिम समाजाचे धार्मिक नेते काझी शेख अब्दुल हमीद मुहम्मद सालिमुल काद्री बदायूंनी यांचे रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला चाहत्यांची अलोट गर्दी उसळली. यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. या अंत्ययात्रेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
रविवारी काजी अब्दुल हमीद मोहम्मद सलीमुल काद्री यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समाजात हजारोंच्या संख्येने लोकांनी त्यांच्या अंत्ययात्रेला गर्दी केली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या अंत्ययात्रेच्या व्हिडिओमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे. याशिवाय या अंत्ययात्रेतील सहभागींनी मास्कही घातलेले नसल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.
पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा म्हणाले, “कोविड प्रोटोकॉल तोडण्यासाठी आणि मिरवणुकीत मोठ्या संख्येने जमा झाल्याबद्दल अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे. भादंवि 188, महामारी कायदा आणि भादंविच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ते म्हणाले की, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि मिरवणुकीच्या व्हिडीओ फुटेजच्या साहाय्याने आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
निधन झालेल्या काझींची प्रकृती अनेक दिवसांपासून खालावलेली होती. रविवारी पहाटे 03.41 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त पाहता पाहता सोशल मीडियावर पसरले. यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली. गर्दी एवढी मोठी होती की, पोलीस व प्रशासनाने वारंवार सामजिक अंतर राखण्याचे आवाहन करूनही त्याचे पालन झाले नाही.
FIR registered against unidentified people for violating COVID protocols in Budaun in UP
महत्त्वाच्या बातम्या
- RTI : मुख्यमंत्री बनल्यापासून केजरीवालांनी एकही नवे हॉस्पिटल काढले नाही, जाहिरातींवर मात्र 800 कोटींचा खर्च, वाचा सविस्तर…
- बंगालमध्ये विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी सुवेंदु अधिकारी, निवडणुकीत ममता बॅनजींचा केला होता पराभव
- काँग्रेसचे CWC बैठकीत पराभवावर आत्ममंथन, सोनिया गांधींकडून पक्षात मोठ्या बदलांचे संकेत
- हेमंत बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, नड्डांसमवेत हे नेते होते हजर
- …म्हणूनच कोरोना लसीवरील जीएसटी हटवणे शक्य नाही, अर्थमंत्री सीतारामन यांचे ममता बॅनर्जी यांना उत्तर