वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या मारहाण प्रकरणात त्यांनी अखेर पोलिसांना जबाब दिला. त्या जबानीनंतर दिल्ली पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून FIR दाखल केला. या FIR मध्ये अरविंद केजरीवाल यांचा पीए बिभव कुमार याचे नाव आले आहे. पण केजरीवाल अद्याप गप्पच राहिले. FIR filed over Swati Maliwal’s complaint of assault, name of Delhi CM’s aide mentioned
स्वाती मालीवाल यांना अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण झाली. त्यावेळी अरविंद केजरीवाल आणि सुनीता केजरीवाल हे स्वतः उपस्थित होते. अरविंद केजरीवाल यांना देखील दोन थपडा बसल्या. बिभव कुमार याने स्वाती मालीवाल यांना फरफटत नेले, वगैरे बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियात फिरल्या.
स्वाती मालीवाल यांना मारहाण झाल्यानंतर सुमारे 30 तासांनी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन मालीवाल यांच्याशी “गैरवर्तन” झाल्याची कबुली दिली. परंतु, त्यांनी मारहाणीचा उल्लेख केला नव्हता. दरम्यानच्या काळात अरविंद केजरीवाल लखनऊ दौऱ्यावर गेले. तिथे स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर आपल्या समोरचे दोन माईक त्यांनी अखिलेश यादव आणि संजय सिंग यांच्याकडे फिरवले. स्वाती मालीवाल प्रकरणात अरविंद केजरीवाल बोलायला तयार झाले नाहीत.
स्वाती मालीवाल या स्वतःहून घटनाक्रम सांगायला पुढे आल्या नाहीत. स्वाती मालीवाल यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा त्यांचा आधीचा पती नवीन जयहिंद यांनी केला होता. अखेर पोलिसांनी स्वाती मालीवाल यांच्या घरी जाऊन त्यांची जबानी नोंदवली. पोलीस त्यांच्या घरात 4.00 तास होते. पोलिसांनी एका महिला अधिकाऱ्यांसह स्वाती मालीवाल यांची जबानी नोंदवली. या जबानीनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी अखेर स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात FIR नोंदविला या FIR मध्ये बिभव कुमार याचे नाव आले आहे.
FIR मधल्या नोंदी :
दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत दाखल एफआयआर नोंदविला: 354 (महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी), 506 (गुन्हेगारी धमकी), 509 (शब्द हावभाव किंवा अपमान करण्याच्या हेतूने कृत्य), 323 (आघात) ) आणि IPC चे इतर कलम. स्वाती मालीवाल हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल एफआयआरमध्ये बिभव कुमारच्या नावाचा उल्लेख आहे.