मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सल्लागाराचाही समावेश
प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आम आदमी पार्टीच्या ‘फीडबॅक युनिट’शी संबंधित हेरगिरी प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह सात जणांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. या नव्या एफआयआरमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सल्लागाराचेही नाव आहे. FIR filed against Manish Sisodia in espionage case
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचा कुटुंबीयांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नोटीस!
आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. सीबीआयने सिसोदिया यांच्यावर हा दुसरा एफआयआर नोंदवला आहे. आरोप आहे की आम आदमी पार्टीने २१०६ च्या सुमारास फीडबॅक युनिट तयार केले आणि या फीडबॅक युनिटमधून अनेक लोकांची हेरगिरी करण्यात आली. या यूनिटमध्ये भरतीसाठी केंद्र सरकारची परवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोपही केला जात आहे.
हेरगिरी प्रकरणी मनीष सिसोदिया यांच्यावर एफआयआर दाखल –
केंद्रीय गृहमंत्रालयाने मनीष सिसोदिया यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी दिल्यानंतर १४ मार्च रोजी सीबीआयने एफआयआर नोंदवला. त्यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे, मालमत्तेचा अप्रामाणिकपणे गैरवापर, लोकप्रतिनिधीने विश्वासघात करणे, फसवणूक करण्याच्या उद्देशाने लबाडपणा करणे, खोटे कागदपत्र वापरणे, बनावट खाती करणे आणि लोकसेवकाने गुन्हेगारी गैरवर्तणूक केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
FIR मध्ये केजरीवाल यांच्या सल्लागाराचे नावही –
एफआयआरमध्ये म्हटले आहे की, “९ मार्च रोजी सीबीआय (लाचलुचपत प्रतिबंधक शाखा)चे निरीक्षक विजय ए देसाई यांच्याकडून लेखी तक्रार प्राप्त झाली आहे. दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, दिल्ली सरकारचे तत्कालीन सचिव (दक्षता) सुकेश कुमार जैन, सीआयएसएफचे निवृत्त डिआयजी राकेश कुमार सिन्हा यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे तत्कालीन विशेष सल्लागार आणि सहसंचालक (एफबीयू) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
FIR filed against Manish Sisodia in espionage case
महत्वाच्या बातम्या
- उत्तर कोरियाने पुन्हा डागले लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र, लक्ष्यावर आदळण्यापूर्वी केले 1,000 किमी उड्डाण
- खलिस्तानी समर्थकांनी ब्रिस्बेनमधील भारतीय दूतावास बंद केला, हिंदूंविरोधात पोस्टर लावले
- शक्तिशाली भूकंपामुळे हादरले न्यूझीलंड, रिश्टर स्केलवर 7.0 होती तीव्रता, त्सुनामीचा अलर्ट
- राष्ट्रवादीची छुपी चाल; उद्धवना हळूच बाजूला सार!!