• Download App
    तालिबान्यांची भारतीय स्वातंत्र्य सैनिकांशी तुलना केल्याने समाजवादी पक्षाचे खासदार शफिकूर रहमान बर्क यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा एफआयआर; लगेच मारली पलटी...!!|FIR against Samajwadi Party MP Shafiqur Rehman Burke for comparing Taliban to Indian freedom fighters; Immediately turned around ... !!

    तालिबान्यांची भारतीय स्वातंत्र्य सैनिकांशी तुलना केल्याने समाजवादी पक्षाचे खासदार शफिकूर रहमान बर्क यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा एफआयआर; लगेच मारली पलटी…!!

    वृत्तसंस्था

    संभल : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तालिबानी दहशतवा दहशतवाद्यांची तुलना भारतीय स्वातंत्र्य सैनिकांशी केल्यावरून उत्तर प्रदेशच्या संभलचे समाजवादी पार्टीचे खासदार शफिकूर रहमान बर्क यांच्याविरोधात देशद्रोहाचा एफआयआर दाखल झाला आहे.FIR against Samajwadi Party MP Shafiqur Rehman Burke for comparing Taliban to Indian freedom fighters; Immediately turned around … !!

    मात्र, अशा स्वरूपाचा एफआयआर दाखल झाल्याबरोबर खासदार शफिकूर रहमान बर्क यांनी पलटी मारली असून आपण तालिबान राजवटीचे समर्थन केले नाही. तालिबानी दहशतवादी यांची तुलना भारतीय स्वातंत्र्य सैनिकांशी केली नाही, असा दावा केला आहे.



     

    अफगाणिस्तानच्या नागरिकांना अमेरिकी सैनिकांनी पासून मुक्ती हवी होती. तालिबान्यांनी ती मिळवून दिली. ते त्यांच्या देशाचे स्वातंत्र्यसैनिक आहेत. आपल्या देशातल्या स्वातंत्र्यसैनिकांसारखेच त्यांना स्वतंत्र राहण्याचे अधिकार आहेत, असे वक्तव्य शाफिकूर रहमान बर्क यांनी केले होते.

    हा देशद्रोह आहे. त्यांच्या विरोधात संभल मध्ये एका व्यक्तीने उत्तर प्रदेश पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर १२४ ए, १५₹ ए,२९५ ए या फौजदारी कलमांच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. 124 ए हे देशद्रोह संदर्भातला कलम आहे. 153 ए धार्मिक आधारावर भेदभाव करून अन्याय करण्याविरोधातले कलम आहे, तर 295 ए धर्माचा अपमान करण्या विरोधातले कलम आहे.

    या तिन्ही कठोर कलमांच्या आधारे गुन्हा दाखल झाल्याबरोबर खासदार शफिकूर रहमान बर्क यांची आधीची भाषा बदलली असून आपण भारतीय स्वातंत्र्य सैनिकांची तालिबानी दहशतवाद्यांशी तुलना केली नसल्याचा दावा यांनी केला आहे.

    तालिबानी राजवटीत संदर्भात भारत सरकारची भूमिका घेईल त्या भूमिकेशी मी सहमत असेन, अशी ग्वाही त्यांनी दिली वर मी स्वतंत्रपणे भूमिका कशी काय घेऊ शकतो?, असा सवाल त्यांनी पत्रकारांनाच केला.परंतु खासदार शफिकूर रहमान बर्क यांच्या वक्तव्यांवरून त्यांच्याविरोधात वर उल्लेख केलेल्या कलमांच्या आधारे खटला चालेलच, असे संभल पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

    FIR against Samajwadi Party MP Shafiqur Rehman Burke for comparing Taliban to Indian freedom fighters; Immediately turned around … !!

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट