विशेष प्रतिनिधी
रायपूर : योगगुरू बाबा रामदेव आता पुन्हा नव्याने अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अॅलोपथीबाबत चुकीची माहिती दिल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर रायपूर पोलिसांनी एफआयआ) दाखल केला आहे. याप्रकरणी आयएमए छत्तीसगड शाखेने तक्रार केली आहे. कोरोना संसर्गावर वैद्यकीय वर्ग, भारत सरकार, आयसीएमआर इतर प्रमुख संस्था वापरत असलेल्या औषधांबाबत बाबा रामदेव यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून टीकात्मक विधाने केल्याचा आरोप आहे. FIR against Ramdev Baba
याप्रकरणी आधी आयएमएने तक्रार केली होती. या तक्रारीनुसार बाबा रामदेव यांचे सोशल मिडीयावरील अनेक व्हिडिओ दिशाभूल करणारे आहेत. डॉक्टर, निमवैद्यकीय कर्मचारी, सरकारची सारी आरोग्य केंद्रे आणि प्रशासन एकत्र येऊन कोविड-१९ विषाणूचा मुकाबला करीत असताना बाबा रामदेव यांनी प्रचलित आणि प्रमाणित उपचार पद्धतीबाबत दिशाभूल केली. ९० टक्के रुग्णांना बरे करणाऱ्या आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि अॅलोपथी औषधांबाबत त्यांच्या वक्तव्यांमुळे लोकांचा जीव धोक्यात आला. गेल्या वर्षी सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेचा बाबा रामदेव यांनी भंग केल्याचाही आरोप आहे.
FIR against Ramdev Baba
महत्त्वाच्या बातम्या
- नितीन गडकरी यांनी सांगितला पेट्रोल-डिझेल महागाईला इथेनॉल हाच पर्याय,ग्राहकांची होईल २० रुपयांची बचत
- मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याचे दिले आश्वासन, तरीही संभाजीराजे म्हणाले आंदोलन स्थगित करणार नाही
- भाजपाला विरोध करण्यासाठी कॉँग्रेस, आपच्या नेत्यांनी दिली शंभर कोटी रुपयांची ऑ फर, परमहंस दास यांचा दावा
- केजरीवाल सरकारची उरफाटी निती, दिल्लीला ऑक्सिजन पुरविणे झाला गुन्हा, भाजपा अध्यक्षांची कित्येक तास चौकशी
- द्रमुकला भगव्या रंगाचा इतका तिटकारा, संत थिरूवल्लूर यांची भगव्या वस्त्रातील पोस्टर हटविले