• Download App
    पश्चिम बंगालमध्ये कुरुघोडीचे राजकारण शिगेला, सुवेंदू अधिकारींविरुद्ध एफआयआर दाखल|FIR against Adhikari brothers

    पश्चिम बंगालमध्ये कुरुघोडीचे राजकारण शिगेला, सुवेंदू अधिकारींविरुद्ध एफआयआर दाखल

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता : पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील महापालिकेच्या कार्यालयातून लाखो रुपयांचे मदत साहित्य चोरल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या बंधूंविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.FIR against Adhikari brothers

    नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी ममतादीदींचा पराभव केला होता. निवडणुका होवूनही अजून राज्यातील राजकीय वातावरणातील तणाव कमी झाला नसल्याचे आणि कुरघोडीचे राजकारण सुरु राहणार असल्याचे संकेत आजच्या कारवाईने मिळत आहेत.



    कांथी म्युन्सिपल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह बोर्डाचे सदस्य रत्नदीप मन्ना यांनी ही तक्रार दाखल केली आहे. सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी यांच्या सूचनेनुसार २९ मे २०२१ रोजी गोदामाचे कुलूप उघडण्यात आले.

    त्यातून सरकारी मालकीची लाखो रुपयांची ताडपत्री व मदतसाहित्य चोरण्यात आले, असे एफआयआरमध्ये नमूद केले आहे. दोघा अधिकारी बंधूंनी साहित्य पळविण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांच्या जवानांची मदत घेतली, असेही आफआयआरमध्ये म्हटले आहे.

    भारतीय जनता पक्षाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. सुवेंदू अधिकारी यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.

    FIR against Adhikari brothers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rajpal Yadav : राजपाल यादव म्हणाला- माझ्याकडे ₹1200 कोटींचे काम आहे, तरीही प्रकरण तुरुंगापर्यंत पोहोचले, तक्रारदाराने मालमत्तेची कागदपत्रे आणि सुरक्षा रक्कम नाकारली

    West Bengal : बंगाल SIR- अंतिम यादीत 7.04 कोटींहून अधिक मतदार; 61 लाख लोकांची नावे वगळली

    Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 21 लोकांचा मृत्यू, 8 गंभीर जखमी; 5 किमीपर्यंत ऐकू आला स्फोटाचा आवाज