प्रतिनिधी
मुंबई : मालाड मालवणी परिसरात राहणाऱ्या बांग्लादेशी रोहिंग्या घुसखोरांना शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश बुधवारी मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे पी नॅार्थ प्रशासनाला दिले.बांग्लादेशी – रोहिंग्या घुसखोरांची संपूर्ण माहिती घेऊन ९० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. Find Bangladeshi infiltrators in Malad Malvani
मालाड परिसरात अवैधरित्या राहणाऱ्या बांग्लादेशी घुसखोरांमुळे भुमिपुत्रांच्या हक्कांचे नुकसान होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुंबईतील भूमिपुत्रांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले.
अस्लम शेख यांचा मतदारसंघ
बांग्लादेशी घुसखोरांना शोधण्यासाठीच्या समितीत महापालिका उपायुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी, सहा.पोलीस उपायुक्त व रेशनिंग अधिकारी यांचा समावेश असेल. दरम्यान, हा माजी मंत्री अस्लम शेख यांचा मतदारसंघ असून, पालिका निवडणुकीआधी भाजपाने त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
Find Bangladeshi infiltrators in Malad Malvani
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात महाराष्ट्रासाठी रेल्वे विकासाचे हायस्पीड निर्णय; कोणते ते वाचा!
- दाऊद – हाफिज सईदला भारताच्या ताब्यात कधी देणार? पाकिस्तानी अधिकाऱ्याची बोलती बंद प्रतिनिधी
- पीएफआयच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन पाकिस्तानी, सिमीच्या धर्तीवर काम; एटीएसच्या चौकशीत माहिती उघड
- राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर : साम्य काय??, भेद काय??