• Download App
    Finance Minister Sitharaman भारत-अमेरिका व्यापार करारावर अर्थमंत्री सीतारामन यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या..

    Finance Minister Sitharaman : भारत-अमेरिका व्यापार करारावर अर्थमंत्री सीतारामन यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या..

    Finance Minister Sitharaman

    जाणून घ्या, अमेरिकेसोबत व्यापार करार भारतासाठी का महत्त्वाचा आहे?


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – Finance Minister Sitharaman अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच भारतासोबतच्या व्यापार कराराबद्दल विधान केले आहे. त्यांनी सांगितले की भारतासोबत लवकरच व्यापार करार होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे की भारताला अमेरिकेसोबत नक्कीच चांगला करार करायचा आहा, परंतु त्यासाठी काही अटी असतील.Finance Minister Sitharaman

    अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या आहेत की भारतातील कृषी आणि दुग्ध क्षेत्रासाठी अजूनही काही मर्यादा आहेत. याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाबद्दल सीतारामन यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा व्यापार करारावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “हो, का नाही, आम्हाला एक चांगला करार करायचा आहे.”



    अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले आहे की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची परिस्थिती ८ जुलैपर्यंत पूर्णपणे स्पष्ट होईल. ट्रम्प यांच्या मते, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारात येणारे सर्व अडथळे लवकरच दूर केले जाऊ शकतात.

    या करारात आयटी, उत्पादन आणि सेवा तसेच ऑटोमोबाईल क्षेत्राचा समावेश असू शकतो. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची संपूर्ण परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

    भारतासाठी व्यापार करार का महत्त्वाचा आहे?

    अमेरिकेसोबत व्यापार करार भारतासाठी का महत्त्वाचा आहे हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील स्पष्ट केले. फायनान्शियल एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सीतारामन म्हणाल्या, “आपण ज्या ठिकाणी आहोत आणि आपल्या ध्येयानुसार, आपण जितक्या लवकर मजबूत अर्थव्यवस्थांसोबत असे करार करू तितके ते आपल्यासाठी चांगले असतील.”

    Finance Minister Sitharaman’s reaction on India-US trade deal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : राहुल गांधींचे आरोप काँग्रेसच्या नेत्यांनाच पटेनात, मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपावर कर्नाटकातील मंत्र्याचा सवाल

    Election Commission : बिहार SIR :हटवलेल्या नावांची यादी वा कारण देणे बंधनकारक नाही, निवडणूक आयोगाचे कोर्टात उत्तर

    विधिमंडळात घुसून मारामारी करणाऱ्या नितीन देशमुखचा शरद पवारांच्या पक्षात सन्मान; प्रवक्ते पद देऊन “वाढविला” “मान”!!