विशेष प्रतिनिधी
दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांवर भारताची प्रतिमा कलंकित करण्याचा आरोप करत त्यांच्यावर टीका केली आहे. त्या म्हणतात, लसीकरण कार्यक्रमासाठी भारताचे जगभरामध्ये कौतुक होत असताना, विरोधकांनी मात्र याबाबत पहिल्यापासूनच शंका पसरवली होती. 100 कोटींहून अधिक लसीचे डोस भारतामध्ये देण्यासाठी जो मार्ग अवलंबला त्याची जगभर प्रशंसा होत असताना विरोधक मात्र टीका करताना दिसून येत आहेत. लसीकरण आणि एकूणच आरोग्यसेवा पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये 36000 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. असे निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितले.
Finance Minister Nirmala Sitharaman accused the opposition of tarnishing India’s image
तसेच त्या म्हणतात, संरक्षण क्षेत्रात आणि लष्करात महिलांचा प्रवेश आणि सैनिक शाळांची स्थापणा हा या ठरावाचा एक मोठा भाग होता. महिलेच्या नेतृत्वाखाली विकास हे आमचे ब्रीद वाक्य आहे. असे सीतारामन यांनी सांगितले.
कोरोणा काळामध्ये लोकांच्या जीवाची काळजी आम्ही घेतली. 80 कोटी लोकांना 8 महिने अन्न दिले. तसेच ‘वन नेशन वन रेशन’ जारी करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या योजनेअंतर्गत गोर गरिबांना मोफत रेशनवाटप करण्यावर भर दिला गेला. स्थलांतरित कामगारांना इतर राज्यांमध्ये त्यांच्या कामाच्या ठिकाणी तसेच त्यांची शिधापत्रिका नोंदणीकृत नसलेल्या ठिकाणी रेशन मिळू शकते. हे सर्व ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत’ मुळेच शक्य झाले. असे त्यांनी यावेळी सांगितले.
भ्रष्टाचारमुक्त सरकार बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की डिजिटल इंडिया द्वारे भारतामध्ये अनेक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आली आहे भारत सध्या खूप मोठ्या प्रमाणात बदलाच्या पार्श्वभूमीवर आहे डिजिटल इंडिया मिशन आहे क्षण मुळे त्यांना ही गती मिळाली आहे.
Finance Minister Nirmala Sitharaman accused the opposition of tarnishing India’s image
महत्त्वाच्या बातम्या
- गडबड चीज पीएंगे तो ऐसाही होगा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दारूबंदी निर्णयावर ठाम
- खलिस्तानवाद्यांचा आता थेट कॅनडात जाऊन शोध, शेतकरी आंदोलनात सहभागाचा संशय
- केंद्राने केले आता तुम्हीही करा, इंधनावरील १२ रुपये नफा कमी करून सवलत द्या, नवनीत राणा यांची मागणी
- शरद पवार कधीपासून सरकारची भूमिका मांडायला लागले? चद्रकांत पाटील यांचा सवाल
- मुकेश अंबानी भारतातच राहणार, लंडनला स्थाईक होणार असल्याच्या अफवाच