- सभागृहातील सेक्यनॉलेजनंतर नितीश कुमारांवर सर्वस्तरातून टीका सुरू होती.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : विधानसभा सभागृहात दिलेल्या ‘सेक्स नॉलेज’नंतर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्टीकरण सादर केले आहे. राजकीय गदारोळानंतर आता नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, ज्यात त्यांनी माफी मागितली आहे.Finally, Nitish Kumar apologized in the assembly for ‘that’ offensive statement, said..
बिहारचे मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी फक्त महिलांच्या शिक्षणावर बोललो होतो. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी माफी मागका करणाऱ्यांचेही मी अभिनंदन करतो.
एवढेच नाही तर मुख्यमंत्री नितीश कुमार पुढे म्हणाले की, ‘’आम्ही बिहारमध्ये मोठे काम केले आहे आणि आता आम्ही महिलांच्या उत्थानासाठीही काम करत आहोत. त्याचवेळी सभागृहातही नितीश कुमार यांनी माफी मागितली असून आपल्या वक्तव्याची लाज वाटत असल्याचे म्हटले आहे. तसेच, आपण आपले विधान मागे घेत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मंगळवारी (7 नोव्हेंबर) बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानपरिषदेत असे काही म्हटले होते की, जे ऐकून महिला सदस्य स्तब्ध झाले अन्य काही पुरुष सहकारी हसायला लागले. त्यांच्या ‘सेक्स नॉलेज’ नंतर राजकारण चांगलेच तापले आहे. तेव्हापासून विरोधक त्यांना सातत्याने घेराव घालत आहेत.
आपले स्पष्टीकरण देताना नितीश कुमार म्हणाले की, ‘आम्ही येथे महिलांना शिक्षित करण्याबाबत बोललो आहोत आणि वारंवार सांगत आहोत कीतो, अन् माझ्यावर टी महिला कमी अभ्यास करू शकल्या आहेत. त्यांना अधिक अभ्यास करावा लागेल. महिलांना शिकवण्याची प्रक्रिया आम्ही अनुभवली आणि सुरू केली, असे मुख्यमंत्री म्हणाले. अनेक ठिकाणी शिक्षण नव्हते, त्या ठिकाणी महिलांच्या शिक्षणासाठी पावले उचलली गेली.
Finally, Nitish Kumar apologized in the assembly for ‘that’ offensive statement, said..
महत्वाच्या बातम्या
- केंद्रीयमंत्री प्रल्हाद पटेल यांचा वाहनाला अपघात; तीन जखमी, एकाचा मृत्यू ; जाणून घ्या कसा घडला अपघात?
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी श्रेया बुगडेला पाठवली दिवाळी भेट!
- देशाच्या सीमाभागात नागरिक आणि सुरक्षा व्यवस्थेत सामंजस्य वाढविणार संघ स्वयंसेवक!!; मोदी सरकारच्या भक्कम संरक्षण धोरणाला पूरक भूमिका!!
- उत्तर प्रदेश : अलिगडचे नाव बदलणार! हरिगड ठेवण्याची तयारी सुरू, महापालिकेत प्रस्ताव मंजूर