• Download App
    अखेर 4 महिन्यांनी चीनने नियुक्त केले नवे संरक्षणमंत्री, नौदल प्रमुखांना दिली जबाबदारी Finally after 4 months, China appointed a new defense minister, gave the responsibility to the navy chief

    अखेर 4 महिन्यांनी चीनने नियुक्त केले नवे संरक्षणमंत्री, नौदल प्रमुखांना दिली जबाबदारी

    वृत्तसंस्था

    बीजिंग : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी डोंग जून यांची नवे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. स्थानिक मीडियानुसार, डोंग जून हे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) चे नौदल प्रमुख होते. Finally after 4 months, China appointed a new defense minister, gave the responsibility to the navy chief

    संरक्षण मंत्री पद 4 महिन्यांपासून रिक्त होते. माजी संरक्षण मंत्री ली शांगफू ऑगस्टपासून बेपत्ता आहेत. 29 ऑगस्टपासून ते सार्वजनिक व्यासपीठावर दिसले नाहीत. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्यांना पदावरून हटवण्यात आले होते. चीनने त्यांना कोणतेही कारण न देता काढून टाकले होते. ते आता कुठे आहेत, याची कोणालाही माहिती नाही.

    वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, शांगफू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. शस्त्रास्त्र खरेदीशी संबंधित प्रकरणांमध्ये शांगफू चौकशीला सामोरे जात होते.

    शांगफूवर अमेरिकेने काही निर्बंध लादले होते. डोंग जून यांच्यावर सध्या असे निर्बंध लादलेले नाहीत. तैवान आणि दक्षिण चीन समुद्राशी संबंधित मुद्द्यांवर तणाव कमी करण्यासाठी अमेरिकन सैन्यासोबत एकत्र काम करणे हे चीनच्या संरक्षणमंत्र्यांचे महत्त्वाचे काम आहे.

    जिनपिंग आणि PLA साठी जून महत्त्वाचे

    2021 मध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये नौदल प्रमुख बनण्याआधी आणि जनरल पद प्राप्त करण्यापूर्वी, जून पूर्व कमांडचे नेतृत्व करत होते. चिनी नौदलाची ही सर्वात महत्त्वाची कमांड आहे. नंतर याला ईस्टर्न थिएटर कमांड म्हटले जाऊ लागले. तैवानचे चीनमध्ये विलीनीकरण करण्याची जबाबदारी याच कमांडकडे आहे, यावरून त्यांचे महत्त्व कळू शकते.

    याशिवाय जून हे सदर्न कमांडचे प्रमुखही राहिले आहेत. ही कमांड सर्वात विवादित सागरी क्षेत्र ‘दक्षिण चीन समुद्र’ ची जबाबदारी सांभाळते. येथे चीनचे फिलिपाइन्ससह अनेक देशांशी वाद आहेत आणि सध्या अमेरिकेच्या युद्धनौकाही येथे आहेत.

    Finally after 4 months, China appointed a new defense minister, gave the responsibility to the navy chief

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Kavinder Gupta : लडाखमध्ये LG आणि हरियाणा-गोव्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती; कविंदर गुप्ता यांना केंद्रशासित प्रदेशाची जबाबदारी

    India iphone : भारतात आयफोन बनवणाऱ्या अभियंत्यांना चीनने परत बोलावले; केंद्र सरकारने म्हटले- ॲपलकडे अजूनही पुरेसे अभियंते

    Omar Abdullah : ओमर अब्दुल्ला यांनी कब्रस्तानच्या भिंतीवर चढून फातिहा वाचला; महाराजा हरिसिंग यांच्याविरुद्ध लढणाऱ्यांचा शहीद दिन साजरा केला