• Download App
    आसाममध्ये अखरेच्या टप्प्यामध्ये 78.29 टक्के मतदान ; 337 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद |final stages in Assam 78.29 percent turnout; The fate of 337 candidates is sealed in the voting machine

    आसाममध्ये अखरेच्या टप्प्यामध्ये 78.29 टक्के मतदान ; 337 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद

    वृत्तसंस्था

    दिसपूर : आसाम विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात मंगळवारी सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटापर्यंत 78.29 टक्के मतदान झाले आहे. 126 मतदारसंघासाठी मतदान झाले. final stages in Assam 78.29 percent turnout; The fate of 337 candidates is sealed in the voting machine

    राज्य निवडणूक आयोगाने सांगितले की, 12 जिल्ह्यातील 40 मतदारसंघातील 337 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद झाले आहे.दक्षिण सलमारा जिल्ह्यात सर्वाधिक 88.59 टक्के मतदान झाले आहे.



    कामरूप मेट्रो परिसरात सर्वात कमी म्हणजे 60.34 टक्के मतदान झाले.मनकंचार विधानसभा मतदार संघात 87.66 टक्के सर्वाधिक तर सर्वात कमी 55 टक्के मतदान पूर्व गोहाटीत झाले आहे.

    अनेक मंत्र्याचे भवितव्य सीलबंद

    राज्यात भाजपची सत्ता आहे. मुख्यमंत्री सर्वनंद सोनवाल यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा निवडणूक रिंगणात आहे. भाजपचे मंत्री, जलूकबारीतील उमेदवार हिमंत बिस्व शर्मा, धर्मपुर येथून चंद्र मोहन पटवारी,

    गोहत्ती पूर्वमधून शिक्षणमंत्री सिद्धार्थ भट्टाचार्य, आसाम गण परिषदेचे बोगीयोंग मतदारसंघातून पणीभूषण चौधरी तांच्यासह अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.

    final stages in Assam 78.29 percent turnout; The fate of 337 candidates is sealed in the voting machine

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त