• Download App
    बंगालनंतर यूपीतल्या कायदा सुवव्यस्था स्थितीवरून मोदी – ममता भिडले...!!; राजकीय लढाईच्या नव्या अध्यायाला सुरूवात Fight between Modi and Mamata gets in new political ground UP

    बंगालनंतर यूपीतल्या कायदा सुवव्यस्था स्थितीवरून मोदी – ममता भिडले…!!; राजकीय लढाईच्या नव्या अध्यायाला सुरूवात

    वृत्तसंस्था

    वाराणसी – कोलकाता – पश्चिम बंगालच्या निवडणूकीनंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे पुन्हा एकदा एकमेकांना भिडले आहेत. यावेळी निमित्त आहे, उत्तर प्रदेशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या राजवटीचे. Fight between Modi and Mamata gets in new political ground UP

    वाराणसीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्या सरकारची स्तुती केली. योगींनी फक्त कोविड परिस्थितीच उत्तम हाताळली असे नव्हे, तर उत्तर प्रदेशातली कायदा आणि सुव्यवस्था स्थिती देखील उत्तम हाताळली आहे, असे प्रशस्तीपत्र मोदींनी योगींन दिले.

    उत्तर प्रदेशात पूर्वी गुंडांचे राज्य चालायचे. गेल्या ५ वर्षांमध्ये त्यांना त्यांच्या जागेवर अर्थात तुरूंगात पाठविण्यात आले आहे. महिलांकडे वाकडी नजर करून पाहणाऱ्यांना पोलीस शासन करीत आहेत, असे मोदी वाराणसीत म्हणाले.

    या बाबत कोलकात्याच्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जींना प्रश्न विचारल्यावर त्या मोदींवर भडकल्याच. मोदी बंगालची बदनामी करतात. पण उत्तर प्रदेशात उन्नावपासून हाथरसपर्यंत विविध घटना घडल्यात. तेव्हा मोदींनी किती वेळा सीबीआय, ईडी, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, अल्पसंख्यांक आयोगाची माणसे तिथे तपास करायला पाठविली. उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्यच नाही. तिथे गुंडांचेच राज्य आहे. पण मोदी खोटारडे आहेत. म्हणून ते बंगालची निंदा करतात. बंगालला कारण नसताना बदनाम करतात.

    आपल्या संतत्प उत्तराच्या भरात ममता या मोदींनी liar म्हणजे खोटारडे म्हणाल्या. पण हा असंसदीय शब्द असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेच स्वतःला सावरून sorry म्हणाल्या. पण मोदींवरचे शरसंधान त्यांनी कमी केले नाही.

    Fight between Modi and Mamata gets in new political ground UP

    Related posts

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली