• Download App
    कराडच्या वारांगना वस्तीत भीषण आग; २० ते २५ घरे भस्मसात ; चार सिलिंडर स्फोटाने आगीचे रौद्ररूप|Fierce fire in Karad's prostitute neighborhood; 20 to 25 houses burnt down; A four-cylinder explosion ignited the flames

    कराडच्या वारांगना वस्तीत भीषण आग; २० ते २५ घरे भस्मसात ; चार सिलिंडर स्फोटाने आगीचे रौद्ररूप

    वृत्तसंस्था

    कराड :  कराडच्या वारांगना वस्तीत लागलेल्या भीषण आगीत २० ते २५ घरे भस्मसात झाली. चार सिलिंडरच्या स्फोटाने आगीने रौद्ररूप धारण केले. मध्यरात्री ही घटना घडली.
    Fierce fire in Karad’s prostitute neighborhood; 20 to 25 houses burnt down; A four-cylinder explosion ignited the flames

    टाऊनहॉल, बापूजी सांळुखे पुतळ्यानजीकच्या वारांगना वस्ती आहे. मध्यरात्री दीड वाजता आग लागली. त्यात २० ते २५ घरे जळून खाक झाली. आगीने रौद्ररूप धारण केले असतानाच चार सिलेंडरचा स्फोट झाले. व्यावसायिकांची खोकी आगीच्या भक्ष्यस्थानी आली. दोन महिलांना किरकोळ दूखापत झाली असून कराड नगरपालिका व कृष्णा हॉस्पिटलच्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.



    वस्तीत आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वीही आग लागून जीवित व वित्तहानी झाली होती. मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे अनेक महिला, लहान मुले आक्रोश करीत सुरक्षित स्थळी पळत होती.

    येथील न्यायालयात रात्रपाळीसाठी ड्यूटीवर असणारे होमगार्ड सूहास देवकर यांनी वस्तीत धाव घेतली. घरामध्ये घूसून अनेकांना जाग करीत घराबाहेर पडण्यासाठी मदत केली. तसेच न्यायाधीश निवास्थानात असणाऱ्या न्यायाधिशांनी महिला, मूलांना पाण्याची सोय करीत दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

    Fierce fire in Karad’s prostitute neighborhood; 20 to 25 houses burnt down; A four-cylinder explosion ignited the flames

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CJI BR Gavai : सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचे आरक्षणावर मोठे वक्तव्य, अनुसूचित जातींतही (SC)लागू व्हावे ‘क्रीमी लेयर’

    Nitish Kumar : नितीश कुमार 20 नोव्हेंबरला गांधी मैदानावर शपथ घेणार; BJP आणि JDU मध्ये प्रत्येकी 16 मंत्री

    बांगलादेश स्वतंत्र करण्याची चुकवावी लागली “किंमत”; हीच मोहम्मद युनूस नावाच्या पाकिस्तानी मनोवृत्तीची फ़ितरत!!