विशेष प्रतिनिधी
चंदीगड : महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सुगंध पुढील पिढीपर्यंत पोचावा या उद्देशाने ‘सार्वजनिक गणेशोत्सव समिती’, गुरूग्राम या हरियाणातील सांस्कृतिक संस्थेने १ मे २०२२, रविवार या दिवशी सायंकाळी ६ वाजता मुंबई आणि देशभरात ज्याचे २००० पेक्षा अधिक प्रयोग झाले आहेत असा स्मृतिगंध जागृत करणारा उदय साटम प्रस्तुत ‘मराठी पाऊल पडते पुढे’, हा कार्यक्रम ठेवला आहे. Festival organized on the occasion of Maharashtra Day at Gurugram
हा कार्यक्रम ‘हुडा कम्युनिटी सेंटर, सेक्टर २७, गुरूग्राम’ येथील भव्य वातानुकूलित रंगायनात होणार आहे, ही महाराष्ट्राची लोकधारा अनुभवण्यासाठी साधारण ३०० मराठी लोक उपस्थित राहतील असा कयास आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय अर्थ-राज्यमंत्री, मा. डॉ. भागवत कराड आणि हरियाणाचे भाजप प्रभारी आणि महासचिव, मा. श्री विनोद तावडे यांनी संमती दिली आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते श्री हंसराज अहिर यांचे नेहमीप्रमाणे मार्गदर्शन लाभले आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष मनोज खरड आणि सचिव शांताराम उदागे यांनी दिली आहे.
करोनाच्या काळात हरियाणातील ३०० विद्यार्थ्यांना सह्याद्रीच्या कुशीत सुखरूप पोचवणाऱ्या श्रीकांत जाधव, आय पी एस, एडिजीपी, हरियाणा पोलीस आणि मकरंद खेतमळीस, आय ए एस, डायरेक्टर जनरल, टाऊन अँड कन्ट्री प्लॅनिंग, या मराठी योद्ध्यांच्या सन्मानाचा आणि कृतज्ञतेचा सोहळा देखील अगदी देखण्या आणि नेटक्या स्वरूपात यादिवशी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने सर्वोपरी सहकार्य केले आहे.
Festival organized on the occasion of Maharashtra Day at Gurugram
महत्त्वाच्या बातम्या
- नवनीत राणांशी तुरुंगात हीन वागणूक; राणांच्या पत्रानंतर लोकसभा सचिवालयाचे राज्य सरकारला निर्देश
- चंद्रकांत दादांनी उडवली भोंगे सर्वपक्षीय बैठकीची खिल्ली; नुसती चहा – बिस्किटे, निर्णय नाही!!
- पिस्टल विक्री करणाऱ्या आराेपींकडून ११ पिस्टल जप्त
- किरीट सोमय्यांवरील हल्लाप्रकरणी शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना अटक