• Download App
    दुटप्पी ट्विटरची कायदेमंत्र्यांकडून पोलखोल; कॅपिटॉल हिल हल्ल्यानंतर ट्रम्पचे अकाऊंट सस्पेंड, पण लाल किल्ल्यावरील हल्ला हे “अविष्कार स्वातंत्र्य”| favour of banning any platform but you have to follow the law: Union Minister Ravi Shankar Prasad when asked if Twitter could be banned

    दुटप्पी ट्विटरची कायदेमंत्र्यांकडून पोलखोल; कॅपिटॉल हिल हल्ल्यानंतर ट्रम्पचे अकाऊंट सस्पेंड, पण लाल किल्ल्यावरील हल्ला हे “अविष्कार स्वातंत्र्य”

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरच्या दुटप्पी धोरणाची केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज चांगलीच पोलखोल केली. अमेरिकेत कॅपिटॉल हिलवर हल्ला झाला, तेव्हा ट्विटरने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट सस्पेंड केले. favour of banning any platform but you have to follow the law: Union Minister Ravi Shankar Prasad when asked if Twitter could be banned

    आणि भारतात लाल किल्ल्यावर अतिरेकी संघटनांनी खलिस्तानी झेंडा फडकवला, तेव्हा त्यांची ट्विटर अकाऊंट सस्पेंड केली नाहीत. उलट त्याला अविष्कार स्वातंत्र्याचे नाव देऊन मिरविण्यात आले, अशा कठोर शब्दांमध्ये रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरचा समाचार घेतला.



    केंद्र सरकारने लागू केलेला नवा माहिती तंत्रज्ञान कायदा ट्विटर पाळत नाही. त्यामुळे केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात वाद सुरू आहे. भारतातले नवे कायदे पाळण्याचा ट्विटरचा दावा आहे. पण केंद्र सरकारने तो मान्य केलेला नाही.

    या पार्श्वभूमीवर रविशंकर प्रसाद यांनी केंद्र सरकारची भूमिका मांडली. ते म्हणाले, की पंतप्रधानांपासून सगळे मंत्रिमंडळ ट्विटर अकाऊंट वापरते आहे. तेव्हा आमचा निःपक्षपातीपणा दिसून येतो. पण जेव्हा ट्विटरवर लडखला वादग्रस्त भाग दाखविले जाते, तेव्हा त्यामध्ये सुधारणा करायला ट्विटरला १५ दिवस लागतात.

    हे न्यायाला धरून नाही. इतर लोकशाही देशांप्रमाणेच भारताला आपले सार्वभौमत्व टिकविण्याचा हक्क आहे आणि भारत तो बजावणारच. यात डिजिटल सार्वभौमत्वाचा देखील समावेश होतो, हे भारत विसरत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

    ट्विटरच्या दुटप्पी धोरणाची काही उदाहरणेही रविशंकर प्रसाद यांनी दिली. ते म्हणाले, अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालाच्या वेळी जमावाने कॅपिटॉल हिलवर हल्ला केला. त्यावेळी ट्विटरने काही अकाऊंट ब्लॉक केले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटचा देखील त्यामध्ये समावेश होता.

    पण भारतात शेतकरी आंदोलनाच्या वेळी काही फुटीरतावादी लोकांनी लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडकवला, तेव्हा त्यांची ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्यात आली नाहीत. उलट त्यावेळी त्याला अविष्कार स्वातंत्र्य म्हटले गेले.

    कॅपिटॉल हिल जर अमेरिकेचे अभिमान स्थळ असेल, तर लाल किल्ला देखील भारताचे स्वाभिमान स्थळ आहे. स्वातंत्र्यदिनी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतात. तेथे फुटीरतावादी गोंधळ घालतात, याला अविष्कार स्वातंत्र्य हे नाव देता येणार नाही, असा इशारा देखील रविशंकर प्रसाद यांनी दिला.

    भारत लोकशाहीवादी देश आहे. कोणत्याही प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारची बंदी आम्ही घालू इच्छित नाही. पण या भूमीचे नियम पाळलेच पाहिजेत, याकडे त्यांनी आवर्जून लक्ष वेधले.

    favour of banning any platform but you have to follow the law: Union Minister Ravi Shankar Prasad when asked if Twitter could be banned

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य