• Download App
    bangluru बंगळुरूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या

    bangluru : बंगळुरूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या कबरीवर जावून वडील ढसाढसा रडले

    bangluru

    ‘’मी माझ्या मुलासाठी जमीन खरेदी केली होती, आता त्यावरच त्याचे त्याचे स्मारक बांधले आहे.’’ असं सांगत होते.


    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू – bangluru  बेंगळुरूमध्ये आरसीबीच्या जल्लोषादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ कुटुंबांनी आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले. सरकारने पीडितांच्या कुटुंबियांना भरपाईची रक्कम २५ लाख रुपये केली आहे, परंतु हे पैसे त्यांचे दुःख कमी करू शकत नाहीत.bangluru

    या चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या २१ वर्षीय भूमिका लक्ष्मणचे वडील ढसाढसा रडत आहेत. भूमिका लक्ष्मणच्या वडिलांनी हसन जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्या मुलासाठी एक कबर बांधली आहे. त्या मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे वडील आपल्या मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडत असल्याचा व्हिडिओ समोर आला हा व्हिडिओ पाहणाऱ्यांचेही डोळेही पाणावले आहेत.



    भाजपच्या कर्नाटक युनिटने सोशल मीडिया साइट X वर याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये काही लोक रडणाऱ्या वडिलांचे सांत्वन करताना दिसत आहेत. बीटी लक्ष्मण रडत रडत सांगत होते की, मी माझ्या मुलासाठी जमीन खरेदी केली होती, आता त्यावरच त्याचे त्याचे स्मारक बांधले आहे.

    ते म्हणाले, माझ्या मुलासोबत जे घडले ते इतर कोणासोबतही घडू नये. मी ज्यातून जात आहे त्यातून कोणत्याही वडिलांना जावे लागू नये. मला कुठेही जायचे नाही, मला माझ्या मुलाच्या कबरीजवळ राहायचे आहे.

    भूमिका लक्ष्मण हा अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी होता. त्याचे वडील बीटी लक्ष्मण यांनी सरकारला त्यांच्या मुलाचे शवविच्छेदन करू नये आणि त्याचा मृतदेह ताब्यात द्यावा अशी विनंती केली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पीडितांना भेटण्यासाठी जाऊ शकतात, पण माझ्या मुलाला परत आणू शकणार नाहीत.

    बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर राजकारणही सुरू झाले आहे. भाजप सतत काँग्रेसवर गैरव्यवस्थापन आणि निष्काळजीपणाचा आरोप करून त्यांच्यावर निशाणा साधत आहे. त्याच वेळी, काँग्रेस भाजपला या मुद्द्याचे राजकारण करू नये असे वारंवार आवाहन करत आहे.

    Father cries as he visits the grave of his son who died in a stampede at bangluru

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटक: आमदाराच्या PAच्या निलंबनाला स्थगिती, RSSच्या कार्यक्रमात सहभागाबद्दल झाली होती कारवाई

    Chabahar Port, : चाबहार बंदरावरील अमेरिकेच्या निर्बंधांतून भारताला सूट; ट्रम्प यांनी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार