जलशक्ती मंत्री स्वतंत्र देव सिंह अपघातस्थळी दाखल
विशेष प्रतिनिधी
कन्नौज : Kannauj आग्रा लखनौ एक्स्प्रेस वेवर लखनऊहून दिल्लीला जात असताना, साकरावा पोलीस स्टेशन हद्दीतील 141 किमी अंतरावर मिश्राबाद गावाजवळ यूपीडीएने उभ्या केलेल्या पाण्याच्या टँकरला स्लीपर बस धडकली.Kannauj
हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहने आदळल्याने दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. बसमध्ये प्रवास करणाऱ्या आठ जणांचा मृत्यू झाला. तर 40 जखमी आहेत.
पोलिसांनी जखमींना सैफई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये दाखल केले. तसेच मृतदेह सैफई येथे पाठवण्यात आले. अपघातावेळी तेथून जात असलेले जलशक्ती मंत्री स्वतंत्र देव सिंह थांबले.
तात्काळ डीएम-एसपीला फोन करून अपघाताची माहिती दिली. अपघात झालेली बस राज कल्पना ट्रॅव्हल्स, गोखले मार्केट, हजारी कोर्ट गेट नंबर 5, मोरी गेट, दिल्ली येथून असल्याचे सांगण्यात येत आहे.
Fatal road accident in Kannauj; Eight killed, 40 injured
महत्वाच्या बातम्या
- New government : नवे सरकार, नवे मंत्री, नवे मुद्दे; पण सरकार विरोधात लढण्यासाठी विरोधकांकडे जुनीच हत्यारे!!
- Sambhal violence : संभल हिंसाचारात एक कोटींच्या मालमत्तेचे नुकसान, हल्लेखोरांकडून वसुली करणार प्रशासन
- Sambit Patra : संबित पात्रा यांच्यावर विशेषाधिकार भंगाची नोटीस
- Gujarat : गुजरातेत तोतया ईडी टीमचा सराफा दुकानावर छापा; 11 अटकेत, 1 फरार