…त्यानंतर मागून येणारी कार बसला धडकली
नवी दिल्ली:यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला असून अपघातानंतर स्विफ्ट कारमध्ये बसलेले ५ जण जिवंत जळाले आहेत. एका बसचे नियंत्रण सुटले आणि ती दुभाजकाला धडकली, त्यानंतर मागून येणारी कार बसला धडकली. अपघातानंतर बसला आग लागली, त्यानंतर 5 जणांचा मृत्यू झाला.Fatal accident on Yamuna Expressway leaves five people burnt alive
आग्राहून नोएडाला जात असताना महावन पोलीस स्टेशन हद्दीतील माईल स्टोन 116 येथे अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ झाला. या घटनेची माहिती देताना ग्रेटर नोएडा पोलिसांनी सांगितले की, मृतांमध्ये एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे, तर इतर चार मृतांचे वय ३० ते ४० वर्षांच्या दरम्यान आहे.
पोलिसांनी सांगितले की, कारमध्ये 8 लोक होते, त्यापैकी तीन प्रवासी सुदैवाने वाचले आहेत, ज्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. तिघांनाही जवळच्या जेवर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तिन्ही जखमींमध्ये 8 ते 16 वयोगटातील मुलांचा समावेश आहे. तर, या दुर्घटनेत ५ जण जिवंत जाळले.
Fatal accident on Yamuna Expressway leaves five people burnt alive
महत्वाच्या बातम्या
- महिला – मुलांना ढाल बनवून मुस्लिमांनी रचली हल्दवानी हिंसाचाराची मोडस ऑपरेंडी; वाचा जखमी कर्मचाऱ्याची जबानी!!
- मिथुन चक्रवर्तींना छातीत दुखू लागल्याने केले रुग्णालयात दाखल
- EPFO: 2023-24 साठी व्याजदर निश्चित, खातेदारांना आता इतका परतावा मिळेल
- लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शाहांची मोठी घोषणा, देशभरात CAA लागू होणार