• Download App
    नैनितालमध्ये भीषण अपघात, ३२ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळी , १४ जण बेपत्ता Fatal accident in Nainital bus full of 32 passengers fell into valley 14 missing

    नैनितालमध्ये भीषण अपघात, ३२ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळी , १४ जण बेपत्ता

    हरियाणातील हिसार येथील शाळेतील मुले आणि कर्मचारी सहलीसाठी नैनिताल येथे आले होते.

    विशेष प्रतिनिधी

    नैनिताल  : उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे बसचे नियंत्रण सुटून ती दरीत  कोसळली. बसमध्ये सुमारे ३२ जण होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि एसडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी बचावकार्य सुरू केले. सुमारे १८ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर रात्री उशीरापर्यंत  १४ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. Fatal accident in Nainital bus full of 32 passengers fell into valley 14 missing

    मिळालेल्या माहितीनुसार, नैनितालच्या कालाधुंगी रोडवर हा अपघात झाला. हरियाणातील हिसार येथील शाळेतील मुले आणि कर्मचारी सहलीसाठी नैनिताल येथे आले होते. रविवारी रात्री उशिरा एक बस खड्ड्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर स्थानिक पोलिसांनी एसडीआरएफला या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर एसडीआरएफ कार्यरत झाले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.

    रिपोर्टनुसार एसडीआरएफ  टीमने रात्री  उशीरापर्यंत सुमारे १८ लोकांना वाचवले आहे, तर १४ लोक अद्याप बेपत्ता आहेत. बचावकार्यानंतर जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे, पोलिसांसह एसडीआरएफच्या पथकांनी बेपत्ता लोकांचा शोध सुरू केला आहे.

    Fatal accident in Nainital bus full of 32 passengers fell into valley 14 missing

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi Police : कुत्रे मोजण्याच्या आदेशावर चुकीची माहिती पसरवली, FIR दाखल; दिल्ली सरकारचा ‘आप’वर आरोप

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- पत्नीकडून खर्चाचा हिशोब मागणे क्रूरता नाही; यासाठी खटला दाखल करू शकत नाही

    Centre Orders : केंद्र सरकार म्हणाले- ग्रोकने 72 तासांत लैंगिक सामग्री हटवावी; शिवसेना खासदारांनी म्हटले होते- एआयच्या माध्यमातून महिलांच्या फोटोवरून कपडे काढले जात आहेत