• Download App
    गोळीबारामुळे आतापर्यंत करता आली नव्हती शेती; जम्मू-काश्मीरच्या सांबा-कठुआ सीमेवर 22 वर्षांनंतर पीक कापणी|Farming was not possible until now due to shelling; Crop harvest after 22 years on Samba-Kathua border of Jammu and Kashmir

    गोळीबारामुळे आतापर्यंत करता आली नव्हती शेती; जम्मू-काश्मीरच्या सांबा-कठुआ सीमेवर 22 वर्षांनंतर पीक कापणी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील सांबा-कठुआ जिल्ह्यांतील सीमावर्ती भागातील वातावरण आता बदलू लागले आहे. जिथे फक्त गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत होते, तिथे 22 वर्षांनंतर गव्हाचे पीक काढले जात आहे. दोन वर्षांपूर्वी सीझ फायरनंतर इतकी वर्षे रिकामी असलेली शेतजमीन शेतकऱ्यांनी नांगरली होती.Farming was not possible until now due to shelling; Crop harvest after 22 years on Samba-Kathua border of Jammu and Kashmir

    कठुआ जिल्ह्याचे मुख्य कृषी अधिकारी संजीव राय गुप्ता सांगतात – भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेजवळ शून्य रेषेवर 251 एकर जमीन लागवड करण्यात आली आहे.



    गोळीबार झाला की घर सोडावे लागायचे

    हिरानगरच्या बोबिया गावात एक छोटेसे दुकान चालवणारे संजय सिंह म्हणतात की, येथील बहुतेक लोक शेतकरी आहेत. गोळीबार झाला की आम्ही शेती करू शकत नव्हतो आणि गुरे चारायला जाऊ शकत नव्हतो. कधी-कधी आमचे प्राणीही क्रॉस फायरमध्ये मारले गेले.

    गोळीबार झाला की आम्ही स्वतःला घरात कोंडून घ्यायचो. खाण्यापिण्याचीही सोय नव्हती. अनेक दिवस गोळीबार सुरू असायचा तेव्हा आम्ही घर सोडून निघून जायचो. काही जीवनावश्यक वस्तू घेऊन कुटुंबासह सुरक्षित ठिकाणी जावे लागायचे.

    मात्र, काही वर्षांपूर्वी गावात मोठे बंकर बांधण्यात आले. आमच्या घराजवळ छोटे बंकरही बनवले होते. गोळीबार झाला की आम्ही त्यात राहायला जायचो. जेव्हापासून परिसरात गोळीबार थांबला आहे, तेव्हापासून लोकांनाही विकासाची स्वप्ने पडू लागली आहेत.

    अनेक दिवसांपासून रखडलेली विकासकामे सुरू झाली आहेत. नवीन रस्ते बांधले जात आहेत. जुन्या रस्त्यांचे रुंदीकरण केले जात आहे. हिरानगर शहरातील राष्ट्रीय स्तरावरील स्टेडियम जवळपास तयार झाले आहे.

    जुने कुंपण काढण्याची मागणी

    सीमेवर राहणारे लोक जुने कुंपण हटवण्याची मागणी करत आहेत. शून्य रेषेच्या एक किलोमीटर आधी जुने कुंपण बसविण्यात आले. अवघ्या 500 मीटर मागे नवीन कुंपण बसवण्यात आले आहे. जुने कुंपण काढल्यास तेथे शेती करणे शक्य होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रस्ते व इतर विकासकामेही शक्य होणार आहेत.

    सीमेवर वसलेल्या गावातही लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले

    चक फकिरा गावतील ज्येष्ठ नागरिक प्रीतम सिंह म्हणतात की, गोळीबारामुळे कोणीही नातेसंबंध ठेवत नव्हते. नेहमीच असुरक्षितता असायची, पण आता परिस्थिती बदलली आहे, त्यामुळे गावातील तरुणांकडून लग्नाचे प्रस्तावही येऊ लागले आहेत.

    आरक्षण जाहीर झाल्यानंतर भरती मेळाव्याची मागणी

    मारहीन ब्लॉकचे बीडीसी अध्यक्ष करण कुमार सांगतात- आंतरराष्ट्रीय सीमेपासून 6 किमीपर्यंत राहणाऱ्या लोकांसाठी 6% आरक्षण जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून स्थानिक लोक विशेष भरती मेळाव्याची मागणी करत आहेत.

    Farming was not possible until now due to shelling; Crop harvest after 22 years on Samba-Kathua border of Jammu and Kashmir

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!