• Download App
    शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन : हरियाणा, यूपी, बिहारनंतर कर्नाटकातही रेल्वे ट्रॅकवर बसले शेतकरी, 30 जागांवर रेल्वे सेवा प्रभावित । Farmers Protest Rail Roko After Haryana, UP, Bihar, Karnataka, farmers sat on railway tracks, railway services affected in 30 places

    शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन : हरियाणा, यूपी, बिहारनंतर कर्नाटकातही रेल्वे ट्रॅकवर बसले शेतकरी, 30 जागांवर रेल्वे सेवा प्रभावित

    लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाचे रेल्वे रोको आंदोलन आज देशभरात (सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत) सुरू आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ केल्याशिवाय लखीमपूर प्रकरणात निष्पक्ष तपास होऊ शकत नाही, असे आघाडीचे म्हणणे आहे. मिश्रा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या नेत्यांनी केली आहे. मोर्चाने लखीमपूर प्रकरणाला नरसंहार म्हटले आहे. अमृतसरमध्ये शेतकरी रेल्वे ट्रॅकवरच आंदोलन करत आहेत. Farmers Protest Rail Roko After Haryana, UP, Bihar, Karnataka, farmers sat on railway tracks, railway services affected in 30 places


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाचे रेल्वे रोको आंदोलन आज देशभरात (सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत) सुरू आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ केल्याशिवाय लखीमपूर प्रकरणात निष्पक्ष तपास होऊ शकत नाही, असे आघाडीचे म्हणणे आहे. मिश्रा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या नेत्यांनी केली आहे. मोर्चाने लखीमपूर प्रकरणाला नरसंहार म्हटले आहे. अमृतसरमध्ये शेतकरी रेल्वे ट्रॅकवरच आंदोलन करत आहेत.

    शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे, रोहतक, पानिपत, सोनीपत, कुरुक्षेत्र, कैथल, बहादूरगढ, अंबाला, जालंधर, लुधियाना, चंदीगड, अमृतसर, जम्मू, मेरठ, गाझियाबाद, शामली, सहारनपूर, मुरादाबाद यासह काही जवळच्या विभागांवर रेल्वे वाहतुकीवर अधिक परिणाम झाला आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांनी या मार्गांवर वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक अडवले आहेत. हरियाणा, यूपी, बिहारनंतर कर्नाटकातही रेल्वे रोखण्यात आल्याचे वृत्त आहे.

    पश्चिम यूपीमध्ये आंदोलनाचा प्रभाव

    या निदर्शनाचा जास्त प्रभाव उत्तर प्रदेशातील पश्चिम जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी मुझफ्फरनगरमधील रेल्वे ट्रॅक अडवला आहे. गाझियाबादमध्येही शेतकऱ्यांनी गाड्या थांबवल्या आहेत. मात्र, बुलंदशहरमधील हरपाल गटाने रेल्वे रोको आंदोलन मागे घेतले आहे.

    शेतकरी आंदोलन पाहता रेल्वे स्टेशन आणि ट्रॅकवर फोर्स तैनात करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले की, आंदोलन पाहता 44 तुकड्या पीएसी आणि 4 तुकड्या पॅरा मिलिटरी फोर्स तैनात करण्यात आल्या आहेत. पश्चिम आयपीच्या 14 संवेदनशील जिल्ह्यांमध्ये वरिष्ठ आयपीएसची तैनाती आधीच सुरू आहे.

    मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र

    लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांडातील शहीदांच्या अस्थीसह उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब आणि इतर राज्यांमध्ये शहीद कलश यात्रा काढल्या जात असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाने दिली. यात मोठ्या संख्येने लोक सामील होत आहेत. शेतकरी नेत्यांनी इशारा दिला आहे की, रेल रोको आंदोलनानंतरही त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. देशभरातील शेतकरी नेते भेटून पुढील योजना आखतील.

    Farmers Protest Rail Roko After Haryana, UP, Bihar, Karnataka, farmers sat on railway tracks, railway services affected in 30 places

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य