• Download App
    जाणत्या राजांकडे पाहून शेतकऱ्यांनी संपविले जीवन; राज्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे उघड । Farmers ended their lives by looking at wise kings; Revealed the highest number of suicides in the maharashtra state

    जाणत्या राजांकडे पाहून शेतकऱ्यांनी संपविले जीवन; राज्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे उघड

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यात सामान्यांचे जीवन खडतर बनले आहे. शेतमजूर आणि शेतकरी यांच्या संकटात वाढ झाली आहे. २०२० मध्ये सुल्तानी संकटाला कंटाळून जाणत्या राजांकडे पाहत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण १८ टक्क्यांनी अधिक असल्याने ही बाब अधिकच चिंताजनक आहे. Farmers ended their lives by looking at wise kings; Revealed the highest number of suicides in the maharashtra state

    राज्यात जाणते राजे असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात? हे कोडे उलगडत नाही. शेतकरी कर्जाच्या फेऱ्यात अडकतो आणि शेवटी आत्महत्येचे पाऊल उचलतो. असे नेहमीच दिसते. कधी विषारी औषध तर कधी गळफास घेऊन तो जीवन संपवत आहे. आत्महत्येचे सत्र थांबणार तरी कधी. एकट्या महाराष्ट्रात ४ हजार ६ जणांनी जीवन संपविले. २०१९ व २०२० मध्ये आत्महत्या अधिक आहेत. २०२० मध्ये शेतमजूर आणि शेतकरी यांच्या आत्महत्येचे प्रमाण ४ टक्के अधिक असल्याचे आकडेवारी सांगते. कर्नाटकात २०१६, आंध्रात ८८९, मध्यप्रदेशात ७३५, छत्तीसगड ५३७ , पंजाबमध्ये २५७, हरियाणात २८० आत्महत्या झाल्या आहेत.



    लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१९ मध्ये आत्मह्त्यात ही राज्ये पुढे होती. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार भारतात २०२० मध्ये १० हजार ६७७ शेतकरी आणि शेतमजुरांची जीवन संपविले आहे. त्यात ५५७९ शेतकरी आणि ५०९८शेतमजुरांचा समावेश होता.

    कोणत्या वर्षी देशात किती आत्महत्या

    २०१६ साली : ११३८९

    २०१७ साली : १०६५५

    २०१८ साली : १०३८९

    २०१९ साली : १०२८१

    २०२० साली : १०६७७

    कोणती राज्ये भाग्यवान

    एकही शेतकरी आणि शेतमजुराने आत्महत्या केली नाही, अशी काही देशातील राज्ये भाग्यवान आहेत. त्यामध्ये पश्चिम बंगाल, बिहार, नागालँड, त्रिपुरा, उत्तराखंड, चंदीगड ( केंद्र शासित), दिल्ली, लडाख, लक्षद्वीप, पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. या राज्यांनी असे कोणते उपाय योजले ज्यामुळे तेथे शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करत नाहीत. याचा अभ्यास करण्याची गरज आहे.

    Farmers ended their lives by looking at wise kings; Revealed the highest number of suicides in the maharashtra state

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!