वृत्तसंस्था
चंदिगड : शेतकरी आंदोलन पुन्हा पेटले आहे… पण ते पंजाब आणि आम आदमी पार्टी सरकार विरुद्ध!! पंजाब मध्ये मोहाली चंदीगड मार्गावर हजारो शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. गव्हाला, प्रति क्विंटल पाचशे रुपये बोनस, विजेची दरवाढ कमी करणे, मका आणि मूग यांच्यावरील किमान आधारित मूल्य वाढवण्याची मागणी अशा सर्व मागण्यांवर शेतकरी पंजाब मधील भगवंत मान यांच्या सरकारविरोधात आंदोलनात उतरले आहेत. Farmers’ agitation flared up again …, but it was against Punjab and Aam Aadmi Party government!
शेतकऱ्यांनी सध्या मोहाली चंदीगड मार्गावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर चंडीगडची कोंडी करण्याची शेतकरी आंदोलकांची तयारी आहे.
दिल्ली सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनामध्ये प्रामुख्याने पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब मधील शेतकरी होते. शेतकरी आंदोलनात राजकारण असल्याचा आरोप करत आधीच भारतीय किसान युनियन मध्ये उभी फूट पडून शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत आणि नरेश टिकैत हे भारतीय किसान युनियन मधून बाजूला फेकले गेले आहेत. पंजाब मध्ये शेतकरी आंदोलनाचा राजकीय लाभ आम आदमी पार्टीला मिळाला. तिथे प्रचंड बहुमताने सत्ता मिळाली आहे. पण ही सत्ता मिळून अवघे 3 महिने झालेत, तोच या सरकार विरोधात शेतकरी आंदोलन उफाळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी पोकळ घोषणा देऊन काहीही होणार नाही पंजाब सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केले आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात वापरलेले हातखंडे ते पुन्हा वापरत आहेत. हजारो शेतकरी रेशन, गॅस सिलेंडर, कुलर, पंखे, तंबू असे साहित्य घेऊन मोहालीच्या गुरुद्वारात जमले होते. सध्या ते मोहाली चंदीगड महामार्गावर बसून आहेत.
Farmers’ agitation flared up again …, but it was against Punjab and Aam Aadmi Party government!
महत्वाच्या बातम्या