• Download App
    प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधनFamous Santoor player Pandit Shivkumar Sharma passed away

    सूर निमाला : प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

    प्रतिनिधी

    मुंबई : प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी मनोरमा आणि मुलगा राहुल शर्मा आहेत. संतूर वाद्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे थोर संगीतकार अशी पंडित शिवकुमार यांची ओळख होती. Famous Santoor player Pandit Shivkumar Sharma passed away

    1980 च्या दशकात दूरदर्शन वर प्रसिद्ध झालेली संगीत मालिका “मिले सुर मेरा तुम्हारा” यामध्ये शिवकुमारजींचे संतूर वादन खूप गाजले होते. काश्मीर मधल्या दाल लेक मध्ये शिकाऱ्यावर बसून त्यांनी संतूर वर वाजविले “मिले सुर मेरा तुम्हारा”चे सूर भारतातल्या घराघरात पोहोचले होते.

    भारतातल्या प्रत्येक संगीत संमेलनांमध्ये त्यांचे संतूर वादन रसिकांना एका वेगळ्या विश्वात घेऊन जायचे. पुण्याचा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, मध्य प्रदेशातील तानसेन संगीत समारोह, कोलकात्याचा सुरसिंगार समारोह आदी संगीत समारोहांमध्ये शिवकुमारजींचे संतूर वादन ही रसिकांसाठी पर्वणी असायची. त्यांच्या निधनाने भारताचा थोर संगीत सेवक आपल्यातून निघून गेल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य नेत्यांनी व्यक्त केली आहे.

    Famous Santoor player Pandit Shivkumar Sharma passed away

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- मंदिरातील देणगी ही देवाची मालमत्ता; बँका वाचवण्यासाठी नाही

    Anil Ambani : अनिल अंबानी समूहाची १,१२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; आतापर्यंत १०,११७ कोटी रुपये जप्त; मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई

    हुमायून कबीर यांनी बाबरी मशिदीची केली पायाभरणी; पण ही तर ममतांच्या राजकारणाची दुटप्पी नीती!!