वृत्तसंस्था
पटणा : बिहारमधील पाटणा शहरातील 11 जणांचे अख्ख कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. पण, या कुटुंबाने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे निदान, उपचार व्यवस्थित झाल्यास कोरोनामुक्त होता येते, हे अधिक स्पष्ट झाले आहे. Family Of 11 Members From Bihar , Became Corona Nigaitive After Proper Treatment
गेले काही दिवस संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात सापडल्याच्या किंवा काही सदस्यांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे अगोदरच भांबावलेली मंडळी अधिकच घाबरली आहेत.
कोरोनामुक्त झालेल्या या कुटुंबामुळे अन्य रुग्ण आणि नातेवाईकांना धीर येईल, अशीच ही बातमी आहे.बिहारच्या अरवल जिल्ह्यात राहणारे मोहन कुमार यांच्या कुटुंबात 11 सदस्य आहे. हे कुटुंब पाटणातील आशियाना नगरात भाड्याच्या घरात राहते.
कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. संपूर्ण कुटुंबं कोरोनाच्या विळख्यात सापडलं. अडीच वर्षांच्या चिमुकल्यापासून ते 65 वर्षांच्या आजीपर्यंत सर्व जण पॉझिटिव्ह होते.कुटुंबाने कोरोनाचा धसका घेतला.
कुटुंबप्रमुख मोहन कुमार ही चिंतेत सापडले. लागली. मानसिकरित्या ते खचलेच होते. त्यांनी प्रथम भीती आणि चिंतेवर मात केली. ते कोरोनामुक्त झाल्यावर त्यांनी हळूहळू कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली. आज त्यांचे कुटुंब कोरोनामुक्त झालं आहे. सर्वांची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली आहे.
Family Of 11 Members From Bihar , Became Corona Nigaitive After Proper Treatment