• Download App
    पुण्यात मृत महिलेच्या नावावर 6 बांगलादेशी घुसखोरांचा बनावट भाडे करार; एकूण 70 घुसखोरांच्या पासपोर्ट घोटाळ्याचा पर्दाफाश!! Fake rent agreement with dead woman ‘verified’, 6 illegal Bangladeshi nationals get Indian passports on Pune slum address

    पुण्यात मृत महिलेच्या नावावर 6 बांगलादेशी घुसखोरांचा बनावट भाडे करार; एकूण 70 घुसखोरांच्या पासपोर्ट घोटाळ्याचा पर्दाफाश!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : मृत महिलेच्या नावावर बनावट भाडे करार करून 70 बांगलादेशी घुसखोरांना पासपोर्ट मिळवून देण्याच्या मोठा पासपोर्ट घोटाळ्याचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. Fake rent agreement with dead woman ‘verified’, 6 illegal Bangladeshi nationals get Indian passports on Pune slum address

    पुण्यात येरवड्यातील यशवंत नगर वस्तीत हा पासपोर्ट घोटाळा झाला असून तेथील एका मृत महिलेच्या नावावर बनावट भाडे करार करून सहा बांगलादेशी घुसखोरांना आखाती देशात जाण्यासाठी पासपोर्ट मिळवून देण्याचा गुन्हेगारांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. पण या कारवाईपूर्वी 70 बांगलादेशी घुसखोर बनावट पासपोर्ट आधारे आखाती देशात नोकरीवर पोहोचल्याचे धक्कादायक बाब पोलीस तपासणीत निष्पन्न झाली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 10 पासपोर्ट जप्त करण्यात आले असून एकूण जणांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.

    ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात एकूण 20 बांगलादेशी घुसखोर आणि पुण्यातील 2 भारतीय एजंट बोरिवली पोलिसांनी अटक केली. त्यांच्या कडून 10 भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आले. हे सर्व पासपोर्ट खोटे भाडे करारनामे जोडून पुण्यातून मिळवले असल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.

    पासपोर्ट पुण्यातील ज्या पत्त्यावर मिळवले, तेथे हे बांगलादेशी कधीच राहात नव्हते. काही बांगलादेशी मुंबईत वास्तव्यास असूनही पुण्याचे रहिवाशी आहोत दाखविण्यासाठी एजंट मार्फत खोटे भाडे करारनामे तयार केले होते. किमान 6 बांगलादेशी घुसखोरांनी तर आपले भाडे करारनामे येरवडा येथील काही वर्षांपूर्वी मरण पावलेल्या महिलेच्या नावे करून तिच्या घरच्या पत्त्यावर पासपोर्ट मिळवले होते.

    पुणे पोलिसांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन व्हेरिफिकेशन न केल्याने एकाच पत्त्यावर अनेक बांगलादेशी घुसखोरांना सहज पासपोर्ट मिळत गेले. अशाप्रकारे भारतीय ओळखपत्र आणि पासपोर्ट मिळवून 70 बांगलादेशी घुसखोर आखाती देशात नोकरीसाठी गेले असल्याचे धक्कादायक वास्तव तपासात समोर आले आहे. पुणे पोलीस या प्रकरणाचा आणखी खोलवर जाऊन छडा लावत आहेत.

    Fake rent agreement with dead woman ‘verified’, 6 illegal Bangladeshi nationals get Indian passports on Pune slum address

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र