वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सरन्याधीश, सुप्रीम कोर्टापर्यंत वेगवेगळ्या महत्त्वाच्या व्यक्ती आणि संस्था संदर्भात फेक न्यूज पसरवणाऱ्या न्यूज हेडलाईन्स या युट्युब चॅनेलविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू झाली आहे. न्यूज हेडलाईन्स या युट्युब चॅनेलचे तब्बल 10 लाख सबस्क्राईबर्स असून 32 कोटी व्ह्यूज झाले आहेत. Fake news web on Prime Minister Modi to Chief Justice
या यूट्यूब चैनल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश तसेच निवडणूक आयोग यासंदर्भात वेगवेगळ्या फेक न्यूज पसरवण्यात आल्या होत्या. सरकारच्या पब्लिक इन्फॉर्मेशन ब्युरोने यासंदर्भात फॅक्ट चेक करून सरकारला अहवाल दिला आहे. त्यामध्ये देशाच्या अनेक महत्त्वाच्या व्यक्ती आणि संस्था संदर्भात न्यूज हेडलाईन्स यूट्यूब चैनलने फेक न्यूज पसरवल्याचे सिद्ध झाले.
सरन्यायाधीशांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासंदर्भात कोणताही आदेश दिलेला नसताना न्यूज हेडलाईन्सने तसे आदेश सरन्यायाधीशांनी दिल्याची फेक न्यूज पसरवली होती. त्याचबरोबर अनेक राजकीय खोट्या बातम्या देखील या न्यूज हेडलाईन्स वर आढळले आहेत.
उत्तर प्रदेशात 131 विधानसभा मतदारसंघांमध्ये फेरनिवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिल्याची फेक न्यूज देखील न्यूज हेडलाईन्सने पसरवली होती.
इतकेच नाही तर पंतप्रधानांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सरन्यायाधीशांनी दिल्याची फेक न्यूज देखील याच न्यूज हेडलाईन्स चॅनेलने पसरवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कायदेशीर कारवाई झाल्यानंतर त्यांच्याकडून पंतप्रधान पद काढून घेऊन ते नितीन गडकरींकडे सोपविण्यात येणार असल्याची फेक न्यूज याच न्यूज हेडलाईन्स चॅनेलने पसरवली होती. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर फेकनेस पसरवल्याबद्दल न्यूज हेडलाईन्स youtube चॅनेलला कठोर कायदेशीर कारवाईला समोर जावे लागण्याची शक्यता आहे.
Fake news web on Prime Minister Modi to Chief Justice
महत्वाच्या बातम्या