• Download App
    लाठीमाराची फेक न्यूज; विरोधकांच्या हिंदू विरोधी मानसिकतेतून वारीला गालबोट!! Fake news of lathi charge in alandi, but anti hindu opposition leaders tried to defame warkari tradition

    लाठीमाराची फेक न्यूज; विरोधकांच्या हिंदू विरोधी मानसिकतेतून वारीला गालबोट!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : आगा जे घडलेच नाही, ते एका फेक न्युजने घडवून आणण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पंढरीच्या वारीला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. आळंदीत जो लाठीमार झालाच नाही, त्याची बातमी लोकमतने दिली. त्याची शहानिशा करण्याची तसदीदेखील संबंधितांनी घेतली नाही आणि नंतर ते ट्विटर डिलीट करून टाकले. पण तोपर्यंत बातमी सगळीकडे पसरली आणि जणू काही आळंदीतल्या वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला, असे चित्र महाराष्ट्रभर तयार झाले. त्यात विरोधकांनी बेजबाबदारपणे प्रतिक्रिया व्यक्त करून भर घातली. Fake news of lathi charge in alandi, but anti hindu opposition leaders tried to defame warkari tradition

    प्रत्यक्ष घटना घडली किंवा नाही, याची शहानिशा करण्याची प्राथमिक जबाबदारी देखील माध्यमे किंवा विरोधी पक्षाचे जबाबदार नेते यांनी दाखवली नाही. यात बारामतीत वारकरी भवनाच्या ऐवजी हज हाऊस बांधणारेही आघाडीवर होते. सत्तेवर असताना वारकऱ्यांना अटक करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती, त्यांचेही प्रवक्ते यात सामील झाले. महाराष्ट्राचे गृहमंत्री अकार्यक्षम असल्याचा फेक नॅरेटिव्ह पसरवणारे टूलकिट सध्या महाराष्ट्रात ऑपरेट करतेच आहे. त्यात कालच्या आळंदीतल्या घटनेची फेक न्यूज वापरण्याची संधी पुन्हा त्या टूलकिटने घेतली.

    आळंदीत नेमके काय घडले??, पोलिसांनी काळजी म्हणून लावलेले बॅरिकेट्स तोडून नेमके कोण मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते??, याची सर्व माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे येऊन दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संदर्भात स्पष्ट खुलासा केला. पण या निमित्ताने विरोधकांची वारीला बदनाम करण्याची हिंदू विरोधी मानसिकताच उघडी पडली.

    या संदर्भात पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केलेला हा स्पष्ट खुलासा :

    पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या 56 पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजन सुद्धा करण्यात आले. मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा तो मान्य केला. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आल्या. मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडी प्रत्येकी 75 जणांनाच पाठवित होते.

    मात्र आज अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार सुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते. बॅरिकेड तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, हे म्हणणे खोटे आहे. सर्व वारकरी, प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, ही माझी नम्र विनंती आहे.

    – विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड

    Fake news of lathi charge in alandi, but anti hindu opposition leaders tried to defame warkari tradition

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती