जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण आणि के घेतलं आहे ताब्यात?
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : इस्लामाबाद: गृहनिर्माण योजना घोटाळ्याप्रकरणी ISIचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल (निवृत्त) फैज हमीद यांना लष्कराने कोर्ट मार्शलपूर्वी अटक केली आहे. पाकिस्तानी लष्कराने सोमवारी ही माहिती दिली.
“पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, आम्ही ‘टॉप सिटी’ प्रकरणात लेफ्टनंट जनरल फैज हमीद (निवृत्त) यांच्या विरोधात केलेल्या तक्रारींची सत्यता पडताळून पाहिली आहे,” असे लष्कराची मीडिया शाखा इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने म्हटले आहे.
“परिणामी, लेफ्टनंट जनरल फैज हमीद (निवृत्त) यांच्यावर पाकिस्तान आर्मी कायद्याच्या तरतुदींनुसार योग्य शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे,” असे त्यात म्हटले आहे. इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) प्रमुखांविरुद्ध पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी लष्कराने एप्रिलमध्ये चौकशी समिती स्थापन केली होती.
Pakistan former ISI chief Faiz Hameed in the custody of the army
महत्वाच्या बातम्या
- Paris olympics : भारताचा खेळाडूंवर 470 कोटी खर्च, माध्यमांनी काढला खुसपटी अर्थ; पण विकसित देश खर्च किती करतात??
- Muhammad Yunus : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचारावर सोडले मौन!
- Hindenburg : हिंडेनबर्गच्या नव्या अहवालावरून भाजपचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
- UPI payments : UPI पेमेंटमध्ये 2 मोठे बदल आहेत, कर भरण्यापासून ते व्यवहारापर्यंत सर्व काही अगदी सोपे होणार